ठाकरे सरकारमुळं हिंदू धर्म संकटात; राज्यपाल दरबारी तक्रार 

गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपल्याने सरकारने काही निर्बंध घातले आहेत.
Hindu religion is in danger says Nitesh Rane
Hindu religion is in danger says Nitesh Rane

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरली नसून लवकरच तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून रुग्णसंख्या विचारात घेऊन लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केले जात आहेत. त्यातच गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपल्याने सरकारने काही निर्बंध घातले आहेत. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे व मुंबईतील काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. (Hindu religion is in danger says Nitesh Rane) 

राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, मुंबईतील स्थिती पश्चिम बंगालसारखी झाली आहे. बंगालमध्येही दुर्गा पुजा उत्सव साजरा करण्यास बंधने घालण्यात आली आहेत. नवीन नियमांनुसार गणेशोत्सव साजरा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. त्याबाबत आम्ही राज्यपालांकडून समस्या मांडल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी काही धार्मिक उत्सव साजरे करण्यात आले. त्यांना कोणतीच अडचण आली नाही. मग फक्त हिंदू धर्मांच्या उत्सवांवरच निर्बंध का? हिंदू धर्म धोक्यात आहे. आम्ही राज्यपालांना आमचे उत्सव वाचविण्याचे आवाहन केलं आहे. अन्यथा ठाकरे सरकार उत्सव संपवून टाकतील, अशी टीका राणे यांनी केली आहे. 

राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींची उंची चार फुटापेक्षा कमी तर घऱगुती गणेशमुर्तींची उंची दोन फुटापर्यंतचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच इतर काही निर्बंधही घालण्यात आल्याने त्यावरून काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी (ता. 8) रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. सध्याची राज्यातील कोरोनाची स्थिती, पुरामुळं राज्यात अनेक ठिकाणी झालेले नुकसान, दरडी कोसळल्याने झालेले मृत्यूचे तांडव, आगामी गणेशोत्सवासह इतर उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून संवाद साधला जाण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com