असला फालतूपणा चालणार नाही, असे म्हणत त्या नगरसेवकांना अजितदादांनी झापले... - Ajit Pawar scolds ncp corporators for colluding with BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

असला फालतूपणा चालणार नाही, असे म्हणत त्या नगरसेवकांना अजितदादांनी झापले...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021

भाजपशी केलेली हातमिळवणी पसंत पडली नाही.. 

पुणे : ‘‘पक्षाचे नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष द्यायाचे नाही. स्वत:ला वाटेल ते करायचे, हे अजिबात खपवून घेतला जाणार नाही,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajiti Pawar) यांनी महापालिकेतील (PMC) स्थायी समितीमधील पक्षाच्या ‘त्या’ तीन सदस्यांची शुक्रवारी कानउघडणी केली. पुणे महापालिकेत विविध प्रस्तावांवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका या तिघांवर ठेवण्यात आला होता.

अजित पवार हे आज दुपारी पुण्यातील सर्किट हाऊस येथे असताना सर्वांसमक्ष या नगरसेवकांना तंबी देण्यात आली. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या नगरसेवकांचे व्हिडीओ फूटेजही तयार ठेवले होते. मात्र ते दाखविण्याची वेळ आली नाही. या नगरसेवकांनी स्वतःचा फारसा बचाव न करता चूक झाल्याचे मान्य केले. 

महापालिकेला ठेकेदारी पद्धतीने सुरक्षारक्षक नेमण्याचे काम भाजप नेत्याच्या ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सव्र्हिसेस प्रा.लि.’या कंपनीला देण्याच्या बाजूने स्थायी समितीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मतदान केले. वास्तविक या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला होता. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील या प्रस्तावाबाबत पक्षाची भूमिका मांडली होती. मात्र, पक्षाच्या समितीतील सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने जगताप यांनी या तिन्ही सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

वाचा ही बातमी :  चंद्रकांत पाटील यांच्या नावे बनावट आदेश : पुण्यात दोनशे कोटींचा जमीन घोटाळा

दरम्यान, पवार शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी जगताप आणि स्थायी समितीतील पक्षाच्या तीन सदस्यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याबद्दल पवार यांनी या सदस्यांची खरडपट्टी केली.

पवार म्हणाले, ‘‘असला फालतूपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पक्षाचे नेते काय सांगतात, त्याकडे लक्ष द्यायाचे नाही. स्वत:ला वाटेल ती भूमिका घ्यायची आणि निवडणूका जवळ आल्या की पक्षाकडे तिकिटासाठी भांडायचे. तुमच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते. येथून पुढे असलेले प्रकार खपवून घेतले जाणार नाही.’’

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख