police take action against two leaders from shirur | Sarkarnama

शिरूरमधील दोन बड्या नेत्यांवर पोलिसांच्या कारवाईने खळबळ

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 जुलै 2019

पुणे : जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी एकाच दिवसात शिरूर तालुक्यातील दोन बड्या नेत्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे शिरूरमध्ये खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात एका महिने फिर्याद दिली आहे. हे प्रकरण बरीच वर्षे जुने होते. बांदल यांचा तालुक्यात वेगळ्या अर्थाने दबदबा असल्याने त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत तक्रार झाली नव्हती. अखेरीस या प्रकरणी तब्बल 90 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला.

दुसरी अशीच कारवाई तालुक्यातील नेत्यावर झाली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यावर सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी व त्यांच्या लुंकड नावाच्या साथीदाराने पैशासाठी दिलेल्या त्रासाने तक्रारदाराला आत्महत्येची वेळ आली होती. त्यांच्यावरही अखेरीस कारवाई झाली. तालुक्यातील राजकीय नेत्यांवर एकाच दिवशी कारवाई झाल्याने सर्वत्र याच प्रकरणांची चर्चा आहे.   

वाचा आधीची बातमी- मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे झेडपी सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यावर सावकारकीचा गुन्हा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख