पुणे झेडपी सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यावर सावकारीचा गुन्हा दाखल

पुणे झेडपी सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यावर सावकारीचा गुन्हा दाखल

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यासह प्रभुल लुंकड आणि शशांक प्रभुल लुंकड या तिघांवर अवैध सावकारकीचा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्यात दाखल झाला. 

याबाबत दीपक रामदास पाचर्णे (रा. कर्डे, ता. शिरूर) यांनी तक्रार दाखल केली आहे.  दीपक व त्यांचे बंधू सुधीर यांनी गावातील सावकार प्रभुल लुंकड यांच्याकडून दहा टक्के प्रति महिना व्याजदराने सात लाख रूपये घेतले होते. त्यासाठी वीस गुंठे जमिनीचे खरेदीखत लिहून दिली होती. आतापर्यंत या कर्जावर सहा लाख रूपये व्याज आणि जमीन दिलेली होती. उरलेले पैसे फेडणे शक्य न झाल्याने लुंकड यांनी हे कर्ज राजेंद्र जगदाळे यांच्या पैशातून दिल्याचे लुंकड यांनी सांगितले. तसेच सतरा लाख रूपये देईपर्यंत जमीन परत दिली जाणार नसल्याचे सांगितले. तसेच जगदाळे आणि लुंकड यांनी घरी येऊन जिवे मारण्याची धमकी दिली, असे या तक्रारीत म्हटले आहे.

सावकारांच्या माणसांनी मला उचलून नेऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून पाचर्णे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com