गणेश विसर्जन : पिंपरी-चिंचवडमधील दुकाने बंद राहणार.. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

हॉटेल, रेस्टॉंरट, फूडकोर्ट सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Ganesh Visrajan
Ganesh Visrajan

पिंपरी : गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) दिवशी गर्दी होऊन कोरोना (Covid-19) वाढू नये म्हणून सलग दुसऱ्या वर्षी पिंपरी-चिंचवडमध्य़े विसर्जन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स उद्या (ता.१९ सप्टेंबर) बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, हॉटेल, रेस्टॉंरट, फूडकोर्ट सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.


विसर्जन मिरवणुकांवर नाही, तर नदीत गणेशमुर्ती विसर्जन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्याकरिता सर्व घाट महापालिकेने पत्रे लावून बंद केले आहेत. नदीत तसेच, तलावातही विसर्जनास बंदी घालण्यात आल्यामुळे शहरातील ९८२ सार्वजनिक आणि एक लाख दहा हजार ५३० घरगुती गणेश मुर्त्यांचे संकलन पालिकेच्या १०७ केंद्रांसह काही खासगी केंद्रांवर उद्या केले जाणार आहे. 

विसर्जन मिरवणुका निघणार नाहीत. तरीही कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. गृहरक्षक दलासह स्ट्रायकिंग फोर्सचीही मदत  घेतली आहे. दोन पोलिस उपायुक्त (डीसीपी), पाच सहाय्यक आयुक्त (एसीपी), ६३ पोलिस निरीक्षक ( पीआय), ७९ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक (एपीआय़,पीएसआय़) आणि ८०८ पोलिस कर्मचाऱी उद्या बंदोबस्तासाठी असणार आहेत.

पालिकेच्या सोबत भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे आणि राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष यांनीही मुर्तीदान, संकलनासह विसर्जनाची व्यवस्था केली आहे. वाघेरेंनी पिंपरीगावातील आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर २५ बाय ६० फूट आकाराचा मंडप त्यासाठी उभारला आहे. सहा मीटर लांबीचे पाण्याचे दोन हौद विसर्जनासाठी तयार करण्यात आले आहेत. येथे जमा  झालेल्या गणेशमुर्ती हिंजवडी येथे महापालिकेने ठरवून दिलेल्या खाणीमध्ये वाहतुक करुन विसर्जित केल्या जाणार आहेत.


 आतापर्यंत अंदाजे सातशेजणांनी या केंद्राचा लाभ घेतला आहे. येथे येतांना कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन  वाघेरे यांनी केले आहे. तर, वाकड परिसरातील गणेश मूर्तीं विसर्जनासाठी वाकडकर यांनी द्रौपदा मंगल कार्यालयातच (वाकड) कृत्रिम तलाव तय़ार केला आहे. तेथे भाविकांना गणेश मुर्तीं विसर्जन आणि दान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी नदी, नाला, ओढ्यात, विहीरीत मुर्ती विसर्जन करुन पर्यावरणास हानी न पोचवता या केंद्राचा वापर कोरोना नियमीचे पालन करत करावा, असे आवाहन वाकडकर यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com