सचिन पायलट यांच्याबाबत माकन यांनी केले हात वर!

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलटयांच्यातील वाद सुरूच आहे. या वादावरील तोडग्याला आता अंतिम स्वरुप दिले जात आहे.
ajay makan says sachin pilot decision will be taken by sonia gandhi
ajay makan says sachin pilot decision will be taken by sonia gandhi

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद सुरूच आहे. या वादावरील तोडग्याला आता अंतिम स्वरुप दिले जात आहे. पायलट यांना काँग्रेस (Congress) पक्षात केंद्रीय पातळीवर महत्वाचे स्थान देण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, पायलट यांच्याबाबत बोलताना पक्षाचे प्रभारी अजय माकन (Ajay Makan) यांनी हात वर केले आहेत. आता पक्षाच्या सोनिया गांधी याच निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. 

राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. पायलट यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात महत्वाचे पद देण्याचा प्रस्ताव आहे. पायलट यांनी यासाठी नकार कळवला आहे. त्यांनी राज्यातच राहण्याची भूमिका पक्षाला कळवली आहे. पुढील विधानसभा निवडणूक 2023 मध्ये होणार असून, यासाठी आतापासूनच तयारी करण्याचे कारण पायलट यांनी दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पायलट यांचे काय होणार यावर बोलताना माकन यांनी हात वर केले. पायलट यांचे राष्ट्रीय स्तरावर काय करायचे हे माझ्या कार्यकक्षेबाहेरील आहे. सोनिया गांधी याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे राज्य स्तरावर काय करायचे असल्यास आम्ही निर्णय घेऊ, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. यामुळे पायलट यांना पक्षात केंद्रीय पातळीवरच स्थान दिले जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे. 

मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला होता. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अजय माकन हे नुकतेच राज्यात  दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. यातच सिद्धू यांचे बंड पंजाबमध्ये यशस्वी पायलट यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. 

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com