मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? काँग्रेसच्या प्रभारींनी दिलं उत्तर

मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतरच याबाबत निर्णय होईल.
congress leader ajay makan clarifies about rajasthan cabinet expansion
congress leader ajay makan clarifies about rajasthan cabinet expansion

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद सुरूच आहे. या दोघांमधील वादामुळे मंत्रिमंडळ विस्तारही रखडला होता आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्याने मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लांबला होता. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतरच याबाबत निर्णय होईल. काँग्रेसचे (Congress) राजस्थान प्रभारी अजय माकन यांनी याविषयी खुलासा केला आहे. 

राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रिमंडळात फेरबदल होणार असून, अनेक मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. त्याजागी मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच गेहलोत यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे हा विस्तार लांबणीवर पडला. आता त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा विस्ताराच्या हालचाली सुरू होतील. प्रभारी अजय माकन यांनीही याला आता दुजोरा दिला आहे. 

मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला होता. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अज माकन हे नुकतेच राज्यात  दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. यातच सिद्धू यांचे बंड पंजाबमध्ये यशस्वी पायलट यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. 

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com