महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांना पक्षाच्या नेत्यानेच घातला ३२ लाखांचा गंडा

महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे यांची ३२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांना पक्षाच्या नेत्यानेच घातला ३२ लाखांचा गंडा
former woman congress president cheated by fellow party leader

पिंपरी : महिला काँग्रेसच्या (Congress) माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे यांची ३२ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाली आहे. वीस वर्षापासून ओळख असलेले पिंपरी -चिंचवड (Pimpari Chinchwad) शहर जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण सेलचे माजी अध्यक्ष अशोक मोरे यांनीच ही फसवणकू केली आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. 

बारा वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी शहरातील निगडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा ७ जूनला दाखल झाला.त्यात श्यामला मच्छिंद्र सोनवणे (वय ६२, रा. निगडी-प्राधिकरण) या फिर्यादी आहेत. अशोक गणपत मोरे (वय ५२, रा. एम्पायर इस्टेट,चिंचवड) आणि त्यांची पत्नी अस्मिता (वय ४७) या आरोपी आहेत.एकाच पक्षाचे काम करीत असल्याने या गुन्ह्यातील आरोपी व फिर्यादींची वीस वर्षापासून ओळख होती. 

फिर्यादी सोनवणेंची मुलगा अश्विनच्या नावे इंजिनिअरींग फर्म आहे. तेथे फॅब्रिकेशनचे काम चालते. तर, आरोपी मोरेची पत्नी अस्मिताच्या नावे खासगी कंपनी आहे. त्यांच्या अस्मिता इंजिनिअरिंग प्रा.लि.मध्ये स्टीलचे सुटे भाग तयार केले जातात. मोरेंनी २००९ ला सोनवणेंना आपल्या घराचे व नंतर कंपनीचे फॅब्रिकेशनचे काम दिले. त्याचे ११ लाख बिल आले. मात्र, ओळख असल्यामुळे आणि मोरे काम देत असल्याने सोनवणेंनी पैशासाठी तगादा लावला नाही. 

दरम्यान, मोरेंची कंपनी डबघाईस आली. त्यांनी ती वाचवण्यासाठी सोनवणेंना विनवणी केल्याने त्यांनी आणखी १२ लाख दिले.त्यातील एक लाख मोरेंनी परत केले.उर्वरित ३२ लाखांची मागणी केली असता मोरेंनी सबबी सांगितल्या. कंपनी कोर्टाने ताब्यात घेतल्याने गोव्यातील आपली खाण विकून पैसे देतो,असे सांगितले. पण, ते दिलेच नाहीत. त्यामुळे सिक्युरिटी म्हणून मोरेंनी दिलेले दहा लाख रुपयांचे चार चेक सोनवणेंनी बॅंकेत टाकले असता ते परत आले. चेक दिलेले बँक खातेच मोरेंनी बंद केले होते. ही फसवणूक लक्षात येताच सोनवणेंनी पोलिसांत धाव घेतली.

व्याजासह सर्व पैसे दिल्याचा मोरेंचा दावा 

दरम्यान, सोनवणेंचे सर्व पैसे व्याजासह दिल्याचा  दावा मोरेंनी 'सरकारनामा'शी बोलताना केला. मी काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सोनवणेच बेकायदेशीर सावकारी करीत असल्याची तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in