काँग्रेस आघाडीच्या पहिल्या यादीत अकोलेकरांना स्थान नाही!

अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीमध्ये चार जागा काँग्रेस तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. यावेळी पुन्हा दोन्ही काँग्रेस एकत्र आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील दोन जागांवर दावा केला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही जागांवर काँग्रेसकडून इच्छुकांची मोठी यादी आहे.
Congress NCP.
Congress NCP.

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत अकोला जिल्ह्यातील जागा वाटपावर एकमत होऊ न शकल्याने काँग्रेसच्या पहिल्या यादीत अकोल्यातील एकाही विधानसभा मतदारसंघाचा समावेश नसल्याची माहिती आहे. ही यादी १० सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, त्यात विद्यमान आमदारांसह गत निवडणुकीतील पराभूत दिग्गज नेत्यांचा समावेश असल्याचे समजते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीमध्ये चार जागा काँग्रेस तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. यावेळी पुन्हा दोन्ही काँग्रेस एकत्र आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने  जिल्ह्यातील दोन जागांवर दावा केला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही जागांवर काँग्रेसकडून इच्छुकांची मोठी यादी आहे. दोन्ही मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसला हे मतदारसंघ आपल्याकडे रहावेत, अशी अपेक्षा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी बाळापूरसाठी आग्रह धरला तर अकोला पश्‍चिमसाठी माजी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांचा आग्रह आहे. 

या दोन्ही नेत्यांच्या दावेदारीमुळे काँग्रेसकडून अकोल्यातील जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नसल्याचे समजते. त्यामुळे दिल्लीत तीन दिवसांपूर्वी अंतिम झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत अकोल्यातील एकाही मतदारसंघाचा समावेश नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही ७० उमेदवारांची पहिली यादी तयार केली असल्याची माहिती आहे. या यादीतही अकोल्यातील एकाही मतदारसंघावर एकमत होऊ शकले नाही. काँग्रेसकडून कोणती भूमिका घेतली जाते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतीक्षा केली जात आहे. त्यानंतरच योग्य त्या निष्कर्षापर्यंत पोहोचून उमेदवार निवडीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

गत निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना पसंती
काँग्रेस आघाडीकडून अद्याप कोणत्या जागा कोणत्या पक्षाकडे जातील याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र दोन्ही पक्षांनी विद्यमान आमदारांसह गत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना प्रथम पसंती दिली असल्याची माहिती आहे. अर्थात यात पराभूत झालेल्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

अकोल्यातील इच्छुकांचा जीव टांगणीला
दोन्ही काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यात होत असलेल्या विलंबामुळे अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. विधासनभा निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी होऊ शकते. गणेश विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी अर्थात १३ सप्टेंबरला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वेळेवर नाव जाहीर झाल्यास तयारी करण्यासाठी वेळ मिळणार नसल्याने इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे.

आघाडीच्या निर्णयाकडे ‘वंचित’ची नजर
अकोला जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. विद्यमान आमदारांपैकी शिवसेनेच्या वाट्याला जाणारे मतदारसंघ वगळले तर इतर ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता काँग्रेस आघाडीकडून कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे वंचित बहुजन आघाडीचे लक्ष लागले आहे. सामाजिक गणितं जुडवून उमेदवारी जाहीर करण्यासाठी काँग्रेसच्या यादीकडे ‘वंचित’ची नजर राहणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com