रिपाइचा फलटण मतदारसंघावर दावा : अविनाश महातेकर

आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप रिपब्लिकन पक्ष्याला दहा जागा सोडणार आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील वाईसह फलटणची जागा मागितली असून फलटण विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा सांगितला आहे, अशी माहिती समाजकल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली.
Ramdas Athavale - Avinash Mahatekar
Ramdas Athavale - Avinash Mahatekar

सातारा : आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप रिपब्लिकन पक्ष्याला दहा जागा सोडणार आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील वाईसह फलटणची जागा मागितली असून फलटण विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा सांगितला आहे, अशी माहिती समाजकल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली.

मंत्री महातेकर सातारा दौऱ्यावर होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. महातेकर म्हणाले, ''रिपाइंच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी रिपाइंचे किमान तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. ही बाब कार्यकर्त्यांना समाधान देणारी आहे. कारण, आत्तापर्यंत केवळ आमचीच मते भाजप-सेनेला दिली जात असे. परंतु आता दोन्ही पक्षाची मते आमच्या उमेदवाराला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासित केले आहे. दरम्यान, आंतरजातीय प्रोत्साहपर अनुदानासह राज्यातील इतर प्रश्‍नांच्या सोडवणूकीसाठी दिल्लीत नुकतीच बैठक झाली. त्यानंतर बरेचसे प्रश्‍न सुटले आहेत.''

ते पुढे म्हणाले, ''जातीअंताची लढाई हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य होते. त्यामध्ये आम्ही सत्तेत असेपर्यंत कोणी खोडा घालू शकणार नाही. राज्याच्या निवडणूकीत कलम 370 चा मुद्दा प्रचारात नक्कीच असणार आहे. कारण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या कलमाला विरोध होता. केवळ नेहरूंच्या आग्रहाखातर अय्यंगार यांनी ते कलम लिहीले. असे असले तरी आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर आरबीआयने सरकारला मदत केली आहे. येत्या काळात परिस्थिती सुधारेल,'' 

दरम्यान, बार्टीमधील 400 पेक्षा अधिक समतादूतांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे, या पत्रकारांच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, ''माझ्यापर्यंत ते निवेदन आले आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल,'' 

निवडणूक लढणे  अधिकार
वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीला कितपत लाभ मिळत आहे, या प्रश्‍नावर महातेकर म्हणाले, ''निवडणूक लढविणे प्रत्येकाचा अधिकार आहे. विशेषत: कोणताही छोटा पक्ष निवडणूक लढवितो. तेव्हा त्याचा लाभ कोणत्याही मोठ्या पक्षाला होत असतो. त्यामुळे त्यांनी निवडणुका लढविणे थांबवू नये.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com