आमदार सरोज अहिरें विरोधात राष्ट्रवादीचे पदाधिकारी जयंत पाटलांकडे

सलग तीस वर्षे शिवसेनेकडे असलेल्या देवळाली मतदारसंघातील आमदाराचा पराभव केल्याने आमदार सरोज अहिरे चर्चेत आल्या आहेत. मात्र विरोधकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने, त्यांच्याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. अहिरे यांच्या विरोधात पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून विरोधकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने हा प्रकार घडला.
Deolali NCP Workers Complains Against MLA Saroj Ahire
Deolali NCP Workers Complains Against MLA Saroj Ahire

नाशिक : सलग तीस वर्षे शिवसेनेकडे असलेल्या देवळाली मतदारसंघातील आमदाराचा पराभव केल्याने आमदार सरोज अहिरे चर्चेत आल्या आहेत. मात्र विरोधकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने, त्यांच्याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. अहिरे यांच्या विरोधात पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून विरोधकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने हा प्रकार घडला. मात्र, वरिष्ठांनी तातडीने योग्य दखल घेतल्याने दोघांमध्ये वेळीच समेट घडून आला. 

मतदारसंघातील पळसे गावात रविवारी ज्येष्ठ नागरिक संस्थेकडून कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला आमदार सरोज अहिरे यांना प्रमुख पाहुणे होत्या. या कार्यक्रमाचे संयोजक तानाजी गायधनी होते. भाजपची सत्ता असताना नियुक्त केलेल्या नाशिक सहकारी साखर कारखाना अशासकीय संचालक मंडळात ते अध्यक्ष होते. स्थानिक पातळीवर ते सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात असतात. ते पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असले तरी सध्या त्यांची भाजपशी जवळीक आहे.

त्यामुळे आमदार अहिरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावताना स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे संतप्त नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश गायधनी यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वेगाने चक्रे फिरून आमदार अहिरे यांना याबाबत विचारणा झाल्याचे सांगितले जाते. 

विशेष म्हणजे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद करत असल्याने लोकप्रिय असलेले प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीही कार्यकर्त्यांच्या तक्रारीची दखल घेतली. सर्व समस्या समजुन घेऊन याबाबत संबंधितांना सुचना करतो असे सांगीतले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका सामान्य कार्यकर्त्यांने केलेल्या तक्रारीची दखल घेतली. त्यामुळे गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते खुश झाले. या कार्यकर्त्याची गावात चांगलीच चर्चा आहे. त्यानंतर आमदार अहिरे यांनीही त्यांच्याशी संवाद साधला.

मी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. मात्र, त्यांनी दूरध्वनी घेतला नाही. मतदारसंघातील कार्यक्रम असल्याने निमंत्रण मिळाल्यावर उपस्थित रहावे लागते. ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम असल्याने उपस्थित राहिले - आमदार सरोज अहिरे

विधानसभा निवडणुकीत आम्ही पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रामाणिक कष्ट घेतले. स्थानिक पातळीवर विरोधी पक्षाच्या लोकांच्या विरोधाची पर्वा केली नाही. त्यामुळे विरोधकांच्या कार्यक्रमास आमदारांनी उपस्थित रहायला नको होते अशी कार्यकर्त्यांची भावना आहे - गणेश गायधनी, अध्यक्ष, नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com