पवारांना समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील : संजय राऊतांचा तोफखाना सुरूच

संजय राऊत अजूनही सरकार स्थापन करण्याबाबत ठाम
पवारांना समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील : संजय राऊतांचा तोफखाना सुरूच

नवी दिल्ली : सरकार स्थापनेवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत हे माध्यमांवरच भडकले असून हा गोंधळ सुरू आहे, तो माध्यमांनीच घातल्याचा आरोप केला. राऊत यांनी आज रोजच्या प्रमाणे सकाळी पत्रकार परिषद घेतली. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व सोनिया गांधी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काल चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गुरु मानतात. हे या लोकांनी लक्षात घ्यावं. त्यांना पवारांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील, असे राऊत यांनी व्यक्त केले. 

संजय राऊत म्हणाले, “सरकारं स्थापन करायला अनेकदा जास्त दिवस लागले आहेत. भाजपचं सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये तर चार-चार, पाच-पाच महिने वेळ लागला आहे. हा जो काही गोंधळ आहे तो माध्यमांच्या मनात असू शकेन. ज्यांनी गोंधळ निर्माण करायचा आहे हे ठरवलंच आहे, राज्यात स्थिर सरकार येऊ नये असं ज्याने ठरवलं आहे त्यांना हा पेच किंवा गोंधळ वाटत असेन. त्यामुळेच ते तशाप्रकारच्या बातम्या पसरवत असतील. शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही.”

नरेंद्र मोदी शरद पवारांना गुरु मानतात. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत जात आहोत असं म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावं. शरद पवार समजून घ्यायला या लोकांना 100 जन्म लागतील. शरद पवार यांचा समाजकारण आणि राजकारणातील अनुभव मोठा आहे. त्यामुळे ते जे बोलत आहेत ते बरोबरच आहे. शरद पवार यांना विरोधात बसण्याचंच जनमत मिळालं आहे आणि आम्ही स्वतंत्र लढलो आहे. मात्र, आता स्थिर सरकारसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही राऊत यांनी नमूद केले.

रामदास आठवलेंच ऐकायचं बाकी होतं”

रामदास आठवलेंनी भाजपला 3 वर्ष आणि शिवसेनेला 2 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला सांगितला. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी रामदास आठवलेचं हेच ऐकायचं बाकी होतं असं म्हणत त्यांना कोपरखळी लगावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com