झेडपी, विधानसभा, लोकसभेसाठी संजय राऊतांचा जळगावात स्वबळाचा नारा

आगामी काळात शिवसेना जिल्ह्यात अगदी लोकसभा निवडणूकही स्वबळावर लढेल, अशी घोषणा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
shivsena leader sanjay raut says shivsena will contest separately
shivsena leader sanjay raut says shivsena will contest separately

जळगाव : स्वबळ काय म्हणतात मला माहिती नाही, मात्र जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात शिवसेनेचे बळ चांगले आहे. निवडणुका लढण्याची शिवसैनिकांची मानसिकता आहे. आगामी काळात शिवसेना जिल्ह्यात अगदी लोकसभा निवडणूकही स्वबळावर लढेल, अशी घोषणा शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केली. 

जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेनेचे बळ आहे. कोणत्याही पद्धतीने निवडणुका लढण्याची मानसिकता शिवसैनिकांची आहे. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बळावर जिंकू आणि यशस्वी होऊ. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार झाला, महापौर झाला आता खासदार शिवसेनेचा व्हावा, अशी अपेक्षा शिवसैनिकांची आहे. ती आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोचवणार आहोत.

महापालिकेतील सत्तांतराने शिवसेनेला बळ 
जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्याने भाजपला व विशेषतः माजी मंत्री गिरीश महाजन यांना जबर धक्का बसला होता. शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली होती. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने हा धक्का बसला. सार्वजनिक बांधकाम मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची खेळी यशस्वी ठरली होती. शिवसेनेने निवडीआधीच विजयाचे फलक लावले होते. मतदानात शिवसेनेला ४५ तर भाजपच्या प्रतिभा कापसेंना केवळ तीस मते पडली. एमआयएमच्या तीन जणांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते.

जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता होती. भाजपचे तब्बल ५७ नगरसेवक तर शिवसेनेचे केवळ १५ नगरसेवक होते. अशा स्थितीत सत्ताबदल अशक्य होता. मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी बंड केले आणि ते शिवसेनेला जाऊन मिळाले. या बंडाआधीच शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच, भाजपच्या बंड करणाऱ्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला होता. त्यानंतर या नेत्यांनी केलेल्या नियोजनानुसार सत्तांतर घडले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com