सावधान! मुंबईत रेड अलर्ट; पुढचे दोन दिवस धोक्याचे

मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागात १३ व १४ जूनला अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
imd issues orange alert in mumbai for next two days
imd issues orange alert in mumbai for next two days

मुंबई : मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरांतील काही भागात १३ व १४ जूनला अतिवृष्टी (Heavy Rainfall) होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे मुंबईत रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी मुंबईतील समुद्र किनाऱ्यालगतच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहनही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. दरम्यान, मॉन्सूनने (Monsoon) आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. 

पाण्याचा उपसा करणारी सहा उदंचन केंद्रे विविध ठिकाणी बसवण्यात आली आहेत. ती कार्यरत असल्याची खातरजमाही करण्यात आली आहे. तसेच, अग्निशमन दलाची पूर आणि बचावपथके मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीसह सज्ज आहेत. याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांची पथकेही सज्ज आहेत. शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी बेस्ट आणि अदानी एनर्जी यांच्या पथकांनाही दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, आरोग्य विभागालाही दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

मुंबईत मिठी नदीच्या पाणीपातळीत पावसामुळे मोठी वाढ होत आहे. यामुळे क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येत आहे. तसेच, एनडीआरएफची एक तुकडी त्या परिसरात तैनात करण्यात आली आहे. महापालिकेच्या २४ विभागांतील शाळांमध्ये नागरिकांसाठी तात्पुरते निवारे निश्चित करण्यात आले आहेत.

सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार  पावसानंतर मुंबईत काल तुरळक पावसाची नोंद झाली. काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसाने उघडीप घेत अधूनमधून विश्रांती घेतली. शहर तसेच पूर्व उपनगराच्या तुलनेत पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, हे दोन दिवस मुंबईसाठी धोक्याचे ठरणार आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com