एकनाथ खडसे यांच्या पत्नी पुन्हा ईडीच्या रडारवर

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
ED summons NCP Leader Eknath Khadses wife
ED summons NCP Leader Eknath Khadses wife

जळगाव : भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई अटकेत आहेत. याच  प्रकरणी आता खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना 'ईडी' ने बुधवारी (ता.१८) कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. आता त्या चौकशीला सामोरं जाणार की नाही, याकडं लक्ष लागलं आहे. (ED summons NCP Leader Eknath Khadses wife)

भोसरी (पुणे) येथील जमिनीचा २४० कोटी रुपयांचा मोबदला मिळण्याची शक्यता असताना अवघ्या ३ कोटी ७५ लाख रुपयांत ही खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. ते या जमीनीचे पाहिले खरेदीदार आहेत. तर मंदाकिनी खडसे या दुसऱ्या खरेदीदार आहेत.

मंदाकिनी खडसे यांना ईडीने यापूर्वीही नोटीस बजावली आहे. मात्र, त्यांनी हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. आता याच प्रकरणी ईडीने त्यांना पुन्हा नोटीस पाठवली असून बुधवारी (ता.१८) कागदपत्रांसह चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. एकनाथ खडसे यांचीही यापूर्वी ईडीने चौकशी केली आहे. तसेच आणखी एका प्रकरणात त्यांची मुलगी अध्यक्ष असलेल्या बँकेला नोटीस पाठवली होती 

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यासह बँकेतील इतर आर्थिक व्यवहारासंबंधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून माहिती मागवली होती. या संदर्भात, जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना विचारले असता, ते म्हणाले होते की, महाराष्ट्रातील ४० कारखान्यांना दिलेल्या कर्जासंदर्भात विविध बँकांकडून ईडीने माहिती मागविली आहे. त्या अन्वये जिल्हा बँकेकडून मुक्ताई साखर कारखान्यास दिलेल्या कर्जाबाबत माहिती विचारण्यात आलेली आहे, अशी माहिती देशमुख यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली होती. 

दरम्यान, एकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी या अगोदरच ईडीकडून नोटीस देण्यात आलेली आहे. या व्यवहाराच्या चौकशीसाठी खडसे यांनी काही दिवसांपूर्वी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. तत्पूर्वी त्यांना कोरोना झाल्याने दोनवेळा त्यांच्या चौकशी पुढे ढकलण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com