चार महिन्यांपूर्वी राजकारणात आले अन् थेट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनले!

देशात पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह काही प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
AAP announces ex army officer as CM face for Uttarakhand
AAP announces ex army officer as CM face for Uttarakhand

डेहराडून : देशात पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह काही प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्षही (AAP) सक्रीय झाला असून पंजाबसह उत्तराखंड इतर राज्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पक्षाचे प्रमुख नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करून आघाडी घेतली. (AAP announces ex army officer as CM face for Uttarakhand) 

केजरीवाल यांनी निवृत्त कर्नल अजय कोठियाल (Ajay Kothiyal) यांचं नाव जाहीर केलं आहे. तसेच त्यांनी जगातील हिंदूंची धार्मिक राजधानी म्हणून उत्तराखंडची ओळख निर्माण करण्याची घोषणाही यावेळी केली. कोठियाल यांनी यावर्षी एप्रिल महिन्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एस. एस. कलेकर यांच्या उपस्थितीत हरिद्वार येथे पक्षात फ्रवश केला आहे. पक्षाकडून आगामी निवडणुकीत सर्व 70 जागांवर उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे. 

कोठियाल यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर केजरीवाल म्हणाले, उत्तराखंडमधील लोकांना राजकारणी नको आहेत, पण देशासाठी लढलेल्या कोठियाल यांच्यासारखे दूत हवे आहेत. अजूनही त्यांच्या शरीर बंदूकीच्या दोन गोळ्या आहे. 2013 मध्ये केदारनाथमध्ये झालेल्या विनाशकारी ढगफुटीमुळं मोठं नुकसान झालं होतं. केदारनाथचे पुनर्निमाण करण्यात कोठियाल यांची महत्वाची भूमिका राहिल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया उत्तराखंडमध्ये आले होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याची चाचपणी त्यांनी केली होती. त्यानंतर आम्ही त्यासाठी सर्वेक्षण केलं. त्यामध्ये आम्हाला कोठियाल यांच्या नावाला मोठा प्रतिसाद दिसून आला. त्यामुळं कोठियाल हे लोकांची मुख्यमंत्री म्हणून उत्तराखंडमधील लोकांची पसंती असल्याचेही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, केजरीवाल यांनी मागील महिन्यातच उत्तराखंडमध्ये 300 युनिटपर्यंतची घरगुती वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपचे दिल्लीचे मॉडेल उत्तराखंडमध्ये राबविण्यावर जोर दिला आहे. पक्ष सत्तेत आल्यास राज्यातील शाळा व आरोग्य सुविधांचा चेहरामोहरा बदलू, असं ते म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com