'इनकमींग'मुळे बिच्चारे भाजप कार्यकर्ते सतरंज्याच उचलत राहणार : सुप्रिया सुळे

खासदार सुळे यांच्या उपस्थितीत काल हॉटेल ग्रीनव्ह्यूच्या पंचम हॉलमध्ये सायंकाळी उद्योजकांसमवेत संवाद कार्यक्रम झाला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नागरीकांनी त्यांना विविध प्रश्‍न विचारले. त्यांचीही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
Supriy Sule Meets Various People in Nashik
Supriy Sule Meets Various People in Nashik

नाशिक : ''सरकारच्या चुकांवर बोलले तर तुरुंगात जावे लागेल अशी आज सामन्यांच्या मनात भिती आहे. त्यामुळे लोक बोलतच नाहीत. आज अनेक प्रश्‍न गंभीर आहेत. लोकांना त्याचा त्रास होतो आहे. त्यामुळे थोडे थांबा, लोकच म्हणतील आधीचे सरकार खुप बरे होते," असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले.

खासदार सुळे यांच्या उपस्थितीत काल हॉटेल ग्रीनव्ह्यूच्या पंचम हॉलमध्ये सायंकाळी उद्योजकांसमवेत संवाद कार्यक्रम झाला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नागरीकांनी त्यांना विविध प्रश्‍न विचारले. त्यांचीही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. यावेळी त्या म्हणाल्या, "राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जीएसटी वेळेत भरला नाही, तर शिक्षा करण्याची भीती दाखविण्यात येते. हिरव्या मिरचीला नाही, पण लाल मिरचीला जीएसटी, हे समजण्यासारखे नाही. त्याच प्रमाणे निर्विवाद सत्ता असताना विरोधकांना प्रोत्साहन देण्याऐवजी घाबरविण्यात येत आहे. ही सारी परिस्थिती अघोषित आणीबाणीसारखी आहे.''

त्या पुढे म्हणाल्या, "राजकारणातील शिस्तीचे 'मॉडेल' असल्याचा डंका पिटला जात असताना आयात करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बिच्चारे कार्यकर्ते सतरंज्या उचलत राहणार. नवीन पॅकेजिंग करून आयातदारांकडे मते मागितली जाणार. लोकांनीच ठरवायचे काय करायचे ते.  अशा साऱ्या गोष्टींमुळे अर्थव्यवस्था घसरत राहिल्यास ती सावरणे कठीण होईल आणि लोकच म्हणतील..आधीचे सरकार बरे होते!'' 

माजी खासदार समीर भुजबळ, शेफाली भुजबळ यांनी सुप्रिया सुळेंचे स्वागत केले. यावेळी आमदार हेमंत टकले, रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड भगीरथ शिंदे, कोंडाजी मामा आव्हाड, नगरसेवक गजानन शेलार, डॉ. कैलास कमोद आदी यावेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com