महेशदादा व लक्ष्मणभाऊंनी दिली मुलाखत; भोसरी व चिंचवडमधून भाजपकडून इच्छुक

उमेदवारी दिली नाही,तर काय करणार अशी विचारणा चिंचवड आणि भोसरी या पिंपरी-चिंचवडमधील दोन विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांना सोमवारी (ता.२६) रात्री करण्यात आली.या दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांचीच उमेदवारी जवळपास नक्की असल्याने तेथे बंडखोरीचा कानोसा या मुलाखतीतून पक्षश्रेष्ठींनी घेतला.
Mahesh Landge - Laxman Jagtap
Mahesh Landge - Laxman Jagtap

पिंपरी : उमेदवारी दिली नाही,तर काय करणार अशी विचारणा चिंचवड आणि भोसरी या पिंपरी-चिंचवडमधील दोन विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांना सोमवारी (ता.२६) रात्री करण्यात आली.या दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांचीच उमेदवारी जवळपास नक्की असल्याने तेथे बंडखोरीचा कानोसा या मुलाखतीतून पक्षश्रेष्ठींनी घेतला. हे दोघेही आमदार या मुलाखतीला सामोरे गेले. पूरग्रस्तांसाठी गाईंच्या मदतीचे ट्रक घेऊन सांगली,कोल्हापूरला जायचे असल्याने लांडगे यांनी सर्वात अगोदर येऊन मुलाखत दिली.

शहर पक्षातील दहशतीचे वातावरण घालविण्यासाठी आमदारकी हवी असल्याचे दोन इच्छुकांनी सांगितले. आमदारकीची उमेदवारी कशासाठी पाहिजे, या विचारलेल्या प्रश्नाला हे उत्तर दिले,असे मुलाखत दिलेल्या दोघांनी सांगितले. या उत्तराचा मुलाखतकर्त्यांना काहीसा धक्का बसला. तसेच त्यामुळे वातावरणात काहीकाळ शांतता पसरली होती. उमेदवारी दिली नाही, तर काय करणार असा प्रश्नही भोसरी आणि चिंचवडमधील इच्छुकांना विचारला गेला. शहरातील तीन जागांसाठी १८ पैकी १४ जणांनी मुलाखती दिल्या.  शहर कार्यालयात त्या झाल्या. एकानेही यावेळी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला नाही. 

राज्यमंत्री आणि पक्षाचे शहर प्रभारी रविंद्र चव्हाण यांनी 'वन टू वन' मुलाखती घेतल्या. तुम्हाला उमेदवारी का द्यावी व आमदार झाल्यावर काय करणार असे प्रश्न सर्वच इच्छुकांना विचारण्यात आले. भोसरीतील इच्छुक व पालिकेतील सत्तारुढ भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार आणि चिंचवडमधून दावेदार असलेले स्वीकृत नगरसेवक अॅड.मोरेश्वर शेडगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत असल्याने ते मुलाखतीला आले नाहीत.

तर, चिंचवडमधूनच संभाजी बारणे, तर पिंपरीतील सीमा सावळे या ज्येष्ठ नगरसेविकांनीही पूर्वनियोजीत भेटीमुळे मुलाखत दिली नाही. जागावाटपात शिवसेनेकडे असलेल्या व युती झाली, तर पुन्हा त्यांच्याकडेच जाणाऱ्या पिंपरी राखीव या मतदारसंघातूनच सर्वाधिक आठजणांनी मुलाखती दिल्या.

सोमवारी या मुलाखती मावळसाठीही सोमाटणेफाटा येथील एका हॉटेलमध्ये झाल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये तीन जागांसाठी १४ जणांनी मुलाखती दिल्या.तर मावळमध्ये एका जागेसाठी तब्बल १५ जणांनी त्या दिल्या. कुणीही शक्तीप्रदर्शन केले नाही.तेथेही विद्यमान आमदार व राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनीही ती दिली. त्यांची मुलाखत प्रभारी आणि राज्य मंत्रीमंडळात राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीच घेतली.

तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके,लोणावळयाच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव,किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकराव शेलार,पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी युवक अध्यक्ष रविंद्र भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर आदींचा त्यात समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com