....मनेगावच्या 'या यमराजांना' दिले जातेय गावोगावातून निमंत्रण! (व्हिडिओ)

मनेगाव (सिन्नर) येथील लोककलाकारांनी स्वनिर्मित पथनाट्य गावाच्या प्रत्येक गल्लीत एव्हढ्या प्रभावीपणे सादर केले की ग्रामस्थांनीही पथनाट्याला अन्‌ या कलाकारांना अक्षरशः डोक्‍यावर घेतले.
Corona Awareness Through Street Play in Nashik District
Corona Awareness Through Street Play in Nashik District

नाशिक : 'कोरोना'विषयी गावोगावी नागरीक सजग झाले आहेत. त्यात राज्य शासन, विविध यंत्रणा सांगतील त्यापेक्षाही अधिक प्रभावी, कल्पक अन्‌ चाकोरीबाहेरची कामे करणारी मंडळी देखील आहेत. मनेगाव (सिन्नर) येथील लोककलाकारांनी स्वनिर्मित पथनाट्य गावाच्या प्रत्येक गल्लीत एव्हढ्या प्रभावीपणे सादर केले की ग्रामस्थांनीही पथनाट्याला अन्‌ या कलाकारांना अक्षरशः डोक्‍यावर घेतले. 

त्याची एव्हढी चर्चा झाली की सध्या तालुक्‍यातील अनेक गावांतील सरपंच, कार्यकर्ते त्यांना निमंत्रीत करीत आहेत. सोमवारी सायंकाळी येथील ग्रामपंचायततर्फे नागरीकांच्या प्रबोदनासाठी पथनाट्य सादर करण्यात आले. त्याचे सादरीकरण देखील अतिशय रंजक होते.

ग्रामसेवक एम. बी. यादव यांच्या संकल्पनेतून व प्रसिध्द नाट्यकर्मी भाऊसाहेब सोनवणे यांचे संवाद लेखन असलेल्या या पथनाट्यात 'कोरोना'ला गावात प्रतिबंध करा. त्यासाठी शासनाने दिलेल्या सुचना पाळा.... सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.... विनाकारण घराबाहेर पडाल तर एरव्ही घरची मंडळी, मित्रांशी तुमची भेट होत असेल, आता 'कोरोना' तुमची भेट थेट यमराजाशी घडवेल. तोच तुम्हाला घ्यायला येईल.... असा संदेश देत तासभर ही मंडळी गावातील सर्व गल्लीबोळात पथनाट्य सादर करीत होती. 

यामध्ये चक्क ग्रामसेवक माधव यादव यमराज, भाऊसाहेब सोनवणे चित्रगुप्त तर आरोग्य सेवक पी. एस. ठापसे यांनी यमदुताचे पात्र साकारले. स्वतः ग्रामपंचायतचे उत्साही पदाधिकारीच एव्हढ्या रंजक पध्दतीने, लोकांना सहज पचनी पडेल अशा स्वरुपात लोकजागृती करीत असल्याने प्रत्येक ग्रामस्थांनीही त्यांचे कौतुक केले. सहाय्यक गटविकास अधिकारी बिब्बे, सरपंच स्वप्नाली सोनवणे, उपसरपंच उर्मिला आंबेकर, सदस्यांनी हे पथनाट्य सादर करणाऱ्या सहकाऱ्यांचे कौतुक करुन आभार मानले. 

त्यांची कल्पकता व सादरीकरण एव्हढे प्रभावी झाले की पाहता पाहता परिसरातील अनेक गावत त्याची चर्चा झाली अन्‌ सगळ्यांनीच त्यांना आमच्याही गावात 'कोरोना' बाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी या, अशी गळ घालायला सुरवात केली आहे. अर्थात कलेची आवड असलेल्या या मंडळींनी 'कोरोना' विरोधातील लढा यशस्वी करण्यासाठी त्यालाही नकार दिलेला नाही.... 

हे देखिल वाचा....'कोरोना' हद्दपार होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण पाळणार 'हा' संकल्प!

सटाणा : 'कोरोना'चा संसर्ग सगळ्यांच्याच चिंतेचा विषय आहे. 'कोरोना'च्या विषाणूला रोखण्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी सगळेच मनापासून कामाला लागले आहे. विविध प्रयत्न करीत आहेत. त्यातच येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी असा संकल्प केला की लोकांत त्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी 'कोरोना'चा विषाणू राज्यातून हद्दपार होईपर्यंत दाढी काढणार नाही, असा संकल्प केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com