'कोरोना' हद्दपार होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण पाळणार 'हा' संकल्प!

येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी असा संकल्प केला की लोकांत त्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी 'कोरोना'चा विषाणू राज्यातून हद्दपार होईपर्यंत दाढी काढणार नाही, असा संकल्प केला आहे.
Nashik EX MLA Sanjay Chavan will not shave untill Corona in Gone
Nashik EX MLA Sanjay Chavan will not shave untill Corona in Gone

सटाणा : 'कोरोना'चा संसर्ग सगळ्यांच्याच चिंतेचा विषय आहे. 'कोरोना'च्या विषाणूला रोखण्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी सगळेच मनापासून कामाला लागले आहे. विविध प्रयत्न करीत आहेत. त्यातच येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी असा संकल्प केला की लोकांत त्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी 'कोरोना'चा विषाणू राज्यातून हद्दपार होईपर्यंत दाढी काढणार नाही, असा संकल्प केला आहे. 

या विषयी घडलेला योगायोगही तसाच आहे. गेले एक्केचाळीस दिवस 'कोरोना' संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतीची, बाजारातील व्यापाऱ्यांची अन्‌ अगदी मजुर, कामगारांच्या समस्याही वाढत आहेत.अनेक जण त्यांच्याकडे अडचण सांगायला येत आहेत. या धावपळीच त्यांना दोन आठवडे दाढी करण्याचे स्मरणच राहिले नाही. शेती, शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी यांची 'कोरोना'मुळे वाताहात झाली. त्यामुळे नागरीक याबाबत अतिशय व्यथीत आहेत. ते पाहिल्यावर माजी आमदार संजय चव्हाण यांनीही जोपर्यंत या घटकांच्या अडचणी सुटत नाहीत. त्यांना पुन्हा रोजगार, गावातील व्यापार उदीम सुरु होत नाही, तोपर्यंत दाढी करणार नाही असा संकल्प केला आहे. 

प्रशासन तसेच स्वतः विविध स्तरावर पाठपुरावा करुन ते लोकांच्या अडचणी सोडवत आहेत.गेल्या दीड महिन्यापासून त्यांनी दाढी केली नसल्याने अनेक जण त्यांना ओळखू शकत नाहीत. सटाणा ही खानदेशातील महत्वाची व्यापारी पेठ आहे. धुळे, नंदुरबार, नाशिकसह विविध भागातून व्यापारी व नागरीक तेथे जात असतात. तालुक्‍यातील लोक बाजाराच्या दिवशी हमखास येतात. जशी माजी आमदार चव्हाण यांच्या संकल्पाची माहिती त्याची ही माहिती मिळाल्यावर लोक उत्सुकता म्हणून आवर्जून त्यांना भेटायला येतात. 'कोरोना' हद्दपार करण्यासाठी शासन, आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्‍टर्स, तज्ञ कार्यरत आहेत. सामाजिक स्तरावर कार्यकर्ते काम करीत आहेत. मात्र, निर्माण झालेल्या अडचणी सोडवता सोडवता एखादा आजार हद्दपार होईपर्यंत दाढीच करणार नसल्याचे उदाहरण विरळेच.

हे देखिल वाचा : छगन भुजबळांच्या जिल्ह्यात वाटण्यासाठी नेत्यांना हवे मोफत धान्य

नाशिक : 'कोरोना'मुळे अनेक राजकीय नेत्यांना दान, धर्म अन्‌ समाजकार्याची उबळ आली आहे. त्यांना अन्न धान्य वाटायचे आहे, मात्र ते फुकटात घेतलेले, सरकारी दुकानांतून येणारे.... त्यासाठी राजकीय मंडळींची टोळधाड चक्क रेशन दुकानदारांच्या धान्यावर पडली आहे. दुकानदार त्रस्त झाले आहेत. त्यांनी चक्क पुरवठा मंत्र्यांना गाठत पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. अन्यथा धान्य वितरणावर बहिष्काराचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.... 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com