राष्ट्रवादी सोडणाऱ्यांनो नाशिकला आल्यास चाबकाचे फटके खायची तयारी ठेवा : पुरषोत्तम कडलग

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक एक बडे नेते पक्ष सोडून चालले आहे. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत उमटत आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम कडलग यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत याविषयी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पंधरा वर्षे सत्तेची फळे चाखली. त्यानंतर कार्यकर्त्यांचा विचार न करता पक्ष सोडत आहेत. पक्षांतर करणारे हे नेते नाशिकला आल्यास त्यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून चाबकाचे फटके खाण्यास तयार रहावे' असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Purushottam Kadlag NCP Nashik
Purushottam Kadlag NCP Nashik

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक एक बडे नेते पक्ष सोडून चालले आहे. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत उमटत आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम कडलग यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत याविषयी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पंधरा वर्षे सत्तेची फळे चाखली. त्यानंतर कार्यकर्त्यांचा विचार न करता पक्ष सोडत आहेत. पक्षांतर करणारे हे नेते नाशिकला आल्यास त्यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून चाबकाचे फटके खाण्यास तयार रहावे' असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पक्ष कार्यालयात झाली. यावेळी विविध कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या सोयीच्या पक्षांतराविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी अध्यक्ष कडलग म्हणाले, ''पक्षाचे विविध लोकप्रतिनिधी, नेते सोयीनुसार पक्षांतर करीत आहेत. त्याच्या रोजच बातम्या येतात. मात्र, या नेत्यांनी पक्षांतर सोपे समजु नये. त्यांना त्याचे परिणाम भोगावेच लागतील. पंधरा वर्षे कॉंग्रेस आघाडी सत्तेत असतांना त्यांनी पदे व सत्तेची फळे चाखली. शरद पवारांनी त्यांना विविध पदे व कामाची संधी दिली. त्या माध्यमातूनच ते कामे करु शकले. मतदारसंघाचा विकास करु शकले. स्वतःची कामे करु शकले. स्वतःची प्रतिमा व प्रतिष्ठा निर्माण करु शकले. मात्र, त्यांना आता सत्तेची चटक लागली आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ''भाजप, शिवसेना यातील काही नेत्यांना ब्लॅकमेलींग करीत असतीलही. परंतु, तुम्ही काय न कोणती संस्कृती आत्मसात केली आहे? फक्त सत्तेसाठी शरद पवारांना सोडण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? या पक्षांतरामुळे जनता अतिशय संतप्त आहे. त्यामुळे पक्षांतरामुळे भाजपची सत्ता येईल या भ्रमात कोणीही राहू नये हा युवकांचा इशारा आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com