MLA Bharat Bhalke Have Not Decided the Party Yet | Sarkarnama

भारत भालके नक्की कुठे जाणार?

हुकूम मुलाणी 
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

गेल्या काही दिवसापासून आ.भारत भालके यांच्या पक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच आज त्यांनी मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या बैठक घेऊन मोठे शक्तिप्रदर्शन केले आणि घेत असलेल्या निर्णयाला जनतेकडून हात वर करून समर्थन घेतले. पण कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवत विरोधकांना झुलवत ठेवले.

मंगळवेढा : गेल्या काही दिवसापासून आ.भारत भालके यांच्या पक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच आज त्यांनी मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या बैठक घेऊन मोठे शक्तिप्रदर्शन केले आणि घेत असलेल्या निर्णयाला जनतेकडून हात वर करून समर्थन घेतले. पण कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवत विरोधकांना झुलवत ठेवले.

मेगा भरती च्या निमित्ताने राज्यातील भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच या प्रवेश करणा-या यादीत आ. भालके यांचे देखील नाव आले. अशा परिस्थितीत त्यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह पंढरपूर रोडवर मोठे शक्ती प्रदर्शन केले. यामध्ये त्यांनी मी घेत असलेल्या निर्णयाला आपले समर्थन आहे का, असे त्यांनी विचारताच जनतेने हात वर करत समर्थन दिले. परंतु, कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे मात्र जाहीर केले नसल्यामुळे येत्या आठवडाभरात त्यांचा निर्णय स्पष्ट होणार आहे. त्यानंतर विरोधकांच्या हालचाली स्पष्ट होवून मतदारसंघाची राजकीय गणिते बदलणार आहेत.

त्यामुळे त्यांचे विरोधक त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. पण आजच्या हुलकावणीने आणखी काही नेत्यांना प्रतीक्षेत राहावे लागणार आहे. आज झालेल्या शक्ती प्रश्न उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना आ.भालके म्हणाले, "मला शेतकऱ्याचा पोरगा म्हणून निवडून दिले. दुसऱ्या वेळेस मी केलेल्या कामावर मला संधी दिली म्हणून मी मतदार संघातील सर्वात जास्त प्रश्न विधानसभेत उपस्थित केले आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असताना कोणाला लुबाडले नाही. 35 गावाच्या पाण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करताना या भागाला पाणी मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.''

ते पुढे म्हणाले, "2005 या समान पाणीवाटप कायद्यानुसार  पाणी मिळावे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतून 15 गावाला या योजनेतून न वगळण्यात येता सर्व गावांचा समावेश करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली .ग्रामीण भागातील महिला भगीनीच्या डोक्यावर हंडा कमी करण्यासाठी पाणी योजना राबवली. कृषी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील वाढदिवस लोकांना पाणी मिळण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे.''

यावेळी विजयसिंह देशमुख, मनोहर कलुबर्मे, चंद्रकांत घुले,सुरेश कोळेकर, सुधिर धुमाळ, राहूल साबळे,महमद वसताद, सुरेश कांबळे, यशवंत खताळ, शहाजान पटेल,मनोहर कवचाळे, यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग चौगुले यांनी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख