अरुण पवारांच्या महापौरपदासाठी मुलगा झिजवतोय भाजप नेत्यांचे उंबरे

यंदाचे महापौरपदा खुल्या प्रवर्गाला जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विधानसभेला उमेदवारी हुकल्याने नाराज झालेले भाजप नगरसेवक अरुण पवार त्यासाठी अंग झटकून कामाला लागले आहेत. स्वतः पवार नेत्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, ते नगरसेवकांसमवेत सहलीला असल्याने त्यांचा मुलगा नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारीसाठी त्यांचा किल्ला लढवत आहे.
Nashik Mayor Post Aspirant Arun Pawars Son Meeting BJP Leaders
Nashik Mayor Post Aspirant Arun Pawars Son Meeting BJP Leaders

नाशिक : यंदाचे महापौरपदा खुल्या प्रवर्गाला जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विधानसभेला उमेदवारी हुकल्याने नाराज झालेले भाजप नगरसेवक अरुण पवार त्यासाठी अंग झटकून कामाला लागले आहेत. स्वतः पवार नेत्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, ते नगरसेवकांसमवेत सहलीला असल्याने त्यांचा मुलगा नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारीसाठी त्यांचा किल्ला लढवत आहे.

महापालिकेच्या 16 व्या महापौरपदाचे आरक्षण सोडत खुल्या प्रवर्गासाठी नुकतेच जाहीर झाले. 122 संख्या असलेल्या महापालिकेत भाजपचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. तत्कालीन शहराध्यक्ष व माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी नाशिकमध्ये प्रथमच एकहाती भाजपची सत्ता मिळवली. प्रभाग क्रमांक एकमधील नगरसेवक अरुण पवार यांनी महापौरपद मिळविण्यासाठी ज्येष्ठत्वाचा दाखला देत पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली आहे. 

नगरसेवक पवार सलग चार वेळा भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांनी विधानसभेसाठी बाळासाहेब सानप यांच्या विरोधात उमेदवारी मिळावी म्हगणुन खुप प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे ज्येष्ठत्व म्हणुन महापौरपदावर त्यांनी दावा केला आहे. त्यासाठी त्यांचे पुत्र राहुल पवार यांनी थेट दिल्ली गाठत पूर्व संघटन महासचिव भाजप खासदार संजय जोशी, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. गेली दोन दिवस ते दिल्लीत वडिलांना महापौरपदाची उमेदवारी मिळावी यासाठी 'लॉबींग' करीत आहेत.

सहलीला असलेल्या नगरसेवकांशी चर्चा करुन माजी मंत्री गिरीश महाजन आणि संघटन मंत्री किशोर काळकर महापौरपदासाठी नाव निश्‍चित करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपण राज्यातील नेत्यांच्याही गाठीभेटी घेणार आहोत. माझे वडील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. पक्षाशी एकनीष्ठ आहेत. अनुभवी आहेत त्यांनी आजवर कधीही पक्षाकडे पदासाठी हट्ट केलेला नाही. त्यामुळे त्यांना यंदा न्याय मिळावा म्हणून मी प्रयत्नशील असल्याचे राहुल पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com