शरद पवार काहीही चुकीचे बोलले नाहीत : संजय राऊत

राज्यात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना-भाजपची होती, या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यात चुकीचे काहीच नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत केले.
Sanjay Raut Supported Sharad Pawars Statement
Sanjay Raut Supported Sharad Pawars Statement

नवी दिल्ली : राज्यात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना-भाजपची होती, या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यात चुकीचे काहीच नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत केले.

काल पवार यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चांना ऊत आला होता. त्याबाबत राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, "पवार यांचे म्हणणे तार्किकदृष्ट्या बरोबरच आहे. भाजप-शिवसेना एकत्र लढली. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. पण तो पक्ष सरकार स्थापनेपासून मागे हटला. आता शिवसेना सरकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. किंबहुना आम्ही सरकार निश्चित बनवू,'' 

सरकारचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे करतील काय या प्रश्नाला थेट उत्तर देण्याचे राऊतांनी टाळले. शिवसेना सरकारचे नेतृत्व करेल असे सांगतानाच उद्धव यांनी नेतृत्व करावे ही शेतकऱ्यांची, युवकांची मागणी असल्याचे राऊत म्हणाले. ''मोठ्या राज्यात जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा पूर्ण तयारी करुन सरकार बनवावे लागते. या प्रकारचे सरकार पहिल्यांदा बनत नाही आहे. यापूर्वीही असे सरकार बनले आहे. ते बनवायला वेळ लागतो. छोट्या राज्यात सोपे असते.  पण मोठ्या राज्यात वेळ जातो," असेही राऊत म्हणाले. 

''काँग्रेस व राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व आघाडी आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी सर्वांना एकत्र येऊन चर्चा करावी लागेल, हे शरद पवारांचे म्हणणे बरोबर आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापन केले होते तेव्हाही वेगवेगळ्या विचारांचे पक्ष त्यांच्या बरोबर होते. त्यामुळे सर्वांच्या विचाराने आता सरकार बनवावे लागेल. शेती, बेरोजगारी, आरोग्य, सामाजिक न्याय हे शिवसेनेचे मुद्दे आहेत," असेही राऊत म्हणाले. गेली पाच वर्षे देशात एनडीएचे अस्तित्वच नव्हते, ते असते तर आज जे काही झाले ते झालेच नसते, असेही राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com