रिक्षासाठी मुलाचा पैशांचा गल्ला फोडला पण पोलिसांकडं गेल्यावर बसला सुखद धक्का!

नागपूर येथील ही घटना असून संबंधित पोलिसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Nagpur cop pays fine on behalf of Auto Driver
Nagpur cop pays fine on behalf of Auto Driver

नागपूर : वाहतूकीचा नियम मोडला की पोलिसांकडून दंड वसूल करण्यासाठी अनेकदा कठोर भूमिका घेतली जाते. यातून अनेकदा मोठा वादही झाले आहेत. पोलिसांना मारहाणीपर्यंतचे प्रकार घडले आहेत. अशीच एक रिक्षा पोलिसांनी जप्त केली होती. पण असं काही घडलं की पोलिसानेच या रिक्षाच्या दंडाची रक्कम भरली अन् रिक्षाचालकाला सुखद धक्का दिला. (Nagpur cop pays fine on behalf of Auto Driver)

नागपूर येथील ही घटना असून संबंधित पोलिसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाहतूकीचे नियम मोडले म्हणून नागपूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रोहित खडसे यांची रिक्षा जप्त केली होती. त्यांच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नसल्याने पोलिस रिक्षा घेऊन गेले होते. याबाबत नागपूर पोलिसांनी ट्विटरवरून खडसे यांना बसलेला सुखद धक्का आणि पोलिसांनी दाखवलेल्या दातृत्वाबाबत लिहिलं आहे. 

'सीताबर्डी वाहतूक विभागाचे कार्यालयामध्ये एक ग्रहस्थ त्याने भाड्याने घेतलेली रिक्षा  चलन झाल्याने सोडवण्यासाठी आला होता. तो त्याच्या लहान मुलाचा गल्ला फोडून जमा झालेली रक्कम घेऊन आला, त्याचे डोळे पाणावलेले होते. कार्यालयामध्ये रक्कम देत मी दंड भरायला तयार आहे, माझी रिक्षा परत द्या, असं तो म्हणाला,' असं ट्विट पोलिसांनी केलं आहे. 

रिक्षाचालकाने केलेली विनवणी ऐकून तिथे असलेले वाहतूक विभागाचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अजयकुमार मालवीय यांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी रिक्षाचा दंड भरण्यासाठी मुलाचा पैशांचा गल्ला फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. चिल्लरने भरलेली पिशवी त्यांनी पाहिली. त्यानंतर मालवीय यांनी केवळ त्या पैशांची पिशवीच परत दिली नाही तर स्वत:च दंड भरून रिक्षा सोडली. त्यानंतर खडसे कुटुंब साश्रुनयनांनी रिक्षासह घरी आनंदात गेले.

संबंधित रिक्षा नो पार्किंगमध्ये उभी असल्याने 8 ऑगस्ट रोजी दंड करण्यात आला. त्याच्यावर आधीचाही दंड असल्याने पोलिसांनी ही रिक्षा जप्त केली होती. या घटनेविषयी बोलताना मालवीय म्हणाले, लॉकडाऊनमुळे खडसे यांच्या आर्थिक स्थिती बेताची झाली होती. त्यांच्याकडे काहीच पैशांची बचत नव्हती. त्यामुळे त्यांच्या मुलाचा पैशांचा गल्ला फोडून दंडाची रक्कम भरण्यासाठी ते आले होते. 

मालवीय यांनी खडसे यांचा दंड भरला असला तरी त्यांनी सक्त ताकीदही दिली आहे. यापूढे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, मालवीय यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियात त्यांचं कौतुक होत आहे. अनेकांनी नागपूर पोलिसांचं तसेच पोलिस खात्याचीही वाह वाह केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com