कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकसचे पती खजानसिंगवर बलात्काराचा गुन्हा दाखल

एरवी महिला अत्याचारांवर बोलणाऱ्या चारुलता टोकस आता या पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी पती विरोधात कठोर कारवाईची मागणी करत नैतिकतेच्या आधारावर संघटनात्मक पदाचा राजीनामा देते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Charulata Tokas
Charulata Tokas

अमरावती : माजी मंत्री व माजी राज्यपाल प्रभा राव यांचा जावई व प्रदेश कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष चारुलता राव टोकसचा पती खजानसिंग व त्याचा सहकारी यांच्याव सेक्स स्कॅन्डल व बलात्काराच्या आरोपाखाली दिल्लीच्या बाबा हरिदास नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआरपीएफच्या इन्स्पेक्टर जनरल चारू सिन्हा यांच्या नेतृत्वात विभागीय चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. आरोपी एका मोठ्या राजकीय पृष्ठभूमीतून संबंधित आहेच त्यासह तक्रारदारही कॉन्स्टेबल तर आरोपी हा डीआयजी असल्याने त्याचे प्रशासकीय वजनही यावेळी लक्षात घेण्यात आले आहे. 

तक्रारदार महिलेची २०१० मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली व तिने विभागासाठी अनेक पदक व सन्मान मिळविले. २०१२ पासून तिने विभागाचे केंद्रीय खेळ चमूत सहभाग घेतला तिथे चारुलता टोकस यांचे पती खजानसिंग हे विभागाचे मुख्य क्रीडा अधिकारी होते व सुरजित हा प्रशिक्षक होता. त्यावेळी या मुलीचे वय फक्त २३ वर्ष होते. त्याठिकाणी सुरजित सिंग व खजानसिंग यांचा प्रशिक्षणाच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क आला.

मुलगी दिसायला अतिशय सुंदर असल्याची माहिती सुरजितने खजानला दिली व दोघांनी तिला रिपोर्टिंग वेळेच्या आधी बोलाविले व छेड काढली. त्यानंतर तिला नोकरी व जीव गमावण्याची भीती दाखवत खजानच्या पत्नी चारुलता चालवत असलेल्या जलतरण तलावाच्या ठिकाणी तिला नेत तिच्यावर बलात्कार केला. तिचे निर्वस्त्र फोटो व विडीओ बनविले आणि याचाच वापर करत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. २०१४ साली खजानसिंग टोकसने वसंतकुंज येथील फ्लॅटमध्ये तिला कोंबून ठेवले व साथीदारासह सतत तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. यानंतर या नराधमांनी डीआयजी कार्यालयाचे अतिथिगृह, वसंतकुंज येथील फ्लॅट, आर. के. पूरम येथील घर, द्वारका येथील चारुलता यांच्या घरी व मुनिरका येथील चारुलता टोकस संचालित करीत असलेल्या हेल्थस्पा व जलतरण अशा दिल्लीतील विविध ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार वर्षानुवर्ष अत्याचार केले. तिला नोकरी व जीव गमावण्याची भीती या दोघांनी दिली होती व त्यांच्या मोठ्या संपर्काच्या बळावर त्यांना हे सहज शक्य असण्याच्या शक्यतेवर इतर पीडितांनी दुजोरा दिल्याने पिडिता असहाय्य होती.

खजानसिंग व सुरजित हे दोघेही विभागातील मुलींवर लैंगिक अत्याचार करतात व सेक्स स्कॅन्डल चालवितात, हे मुलीच्या लक्षात आले. सर्व मुली या अत्याचारांनी त्रस्त होत्या व आपसात चर्चा करत होत्या. परंतु खजानसिंग यांच्या राजकीय व विभागीय प्रभावापुढे यांच्यापैकी कुणीही काही बोलण्यास समर्थ नव्हते. घटनेची सुरुवात २०१२ सालची आहे, त्यावेळी केंद्रात कॉंग्रेसचे सरकार व खजानसिंगची सासू राज्यपाल प्रभा राव यांचा रुबाब आणि खजानसिंगची चालती या सर्व पीडित मुलींच्या पाहणीतील व अनुभवातील विषय होते. ही तक्रारदार मुलगी नवीन असल्याने व तिला पिडा असह्य झाल्याने तिने २०१४ साली सी आरपीएफचे आयजी यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी तिच्यावर सर्वार्थाने दबाव आणून व अत्याचारी आयुध वापरून तिला नोकरी वरून काढण्याची तंबी देत खोट्या प्रकरणात फसविण्याची तयारी दाखविण्यात आली. केंद्रीय पोलीस दलातील नोकरी वाचविण्यासाठी, बदनामीच्या भीतीने व जीव वाचविण्यासाठी तिने हे सर्वकाही सहन केले.

यादरम्यान तिने स्वतःच्या खेळाच्या भरवशावर काही पदक व सन्मान मिळविले, यातूनच तिचे मनोबलही वाढले आणि तिने मनात ठाम निर्धार केला इतर मैत्रिणींची व नवीन येणाऱ्या मुलींची यातून सुटका करण्याचे ठरवले. तिने योग्य वेळेसाठी योग्य पुरावे गोळा करण्याला सुरुवात केली. या नराधमांचे तिला येणारे फोन रेकॉर्ड करणे, वारंवार होत असलेल्या अत्याचारांची जमेल तेव्हा छुप्या पद्धतीने रेकॉर्डिंग करणे, आलेले संदेश संग्रहित करणे व इतर सर्व शक्य मार्गाने पुरावे गोळा केले. यादरम्यान ती गरोदर झाली व प्रसूती रजेवरून परतताच सर्व पुराव्यांनिशी तिने डिसेंबर २०२० मध्ये अखेर दिल्लीच्या हरिदास नगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. प्रसूतीसह सर्वच पुरावे मजबूत असल्याने खजानसिंग टोकस व सुरजित यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेत. गंभीर स्वरूपाचे आरोप व दमदार पुरावे असल्याने सीआरपीएफ विभागानेही विषयाला  
गांभीर्याने घेत यावर विभागीय चौकशी कमिटी नेमली.

यामुळे विरोधकांनी आक्रमक होण्याआधीच चारुलता टोकस यांचे महाराष्ट्र महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. महिना होऊनही विरोधकांमध्ये, वर्धा जिल्ह्यात व महाराष्ट्रात याची तिळमात्रही चर्चा नसल्याची पक्षातील वरिष्ठ मंडळींची समजूत घालून अखेर चारुलता टोकस यांनी प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्षपद मिळविले. अलीकडेच जम्मू काश्मीरच्या आयजी श्रीमती चारू सिन्हा यांच्या नेतृत्वातील या कमिटीला आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याने डीआयजी खजानसिंग टोकस व साथीदार सुरजित सिंग यांना बडतर्फ करण्यात आले आहे. विभागीय चौकशीसह कायदेशीर प्रक्रियेतही या दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी असंख्य पिडीत व त्यांच्या परिवारांकडून होत आहे. मोठ्या परिश्रमातून मिळविलेली केंद्रीय विभागातील नोकरी वाचविण्यासाठी, सामाजिक बदनामी टाळण्यासाठी व जीव वाचविण्यासाठी या असंख्य पीडितांनी या नरकयातना सहन केल्या. परंतु या तक्रारदार मुलीच्या हिमतीमुळे त्यांना यातून सुटका मिळाली. यासाठी त्यांनीही आता याप्रकरणात साक्षीदार होण्याचे ठरविले आहे.

एरवी महिला अत्याचारांवर बोलणाऱ्या चारुलता टोकस आता या पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी पती विरोधात कठोर कारवाईची मागणी करत नैतिकतेच्या आधारावर संघटनात्मक पदाचा राजीनामा देते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष चारुलता राव टोकस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com