हेवीवेट नेते नितीन गडकरींकडे आता उरले एकच खाते....

केंद्र सरकारकडे जगाला दाखवण्यासारखी जी काही कामे असतील, त्यामध्ये देशातील रस्ते ही प्रमुख बाब आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. मोदींनी १२ मंत्र्यांना डच्चू दिला Modi gave dutch to 12 ministers आणि इतर मंत्र्यांची खाती कमी करण्यात आली. यामध्ये विदर्भातील भाजपचे हेवी वेट नेते नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्याकडील सूक्ष्म आणि मध्यम लघुउद्योग Micro and medium enterprises हे खाते कमी करण्यात आले. त्यामुळे आता त्यांच्याकडे रस्ते, परिवहन व महामार्ग हे एकच खाते उरले आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये मंत्रिमंडळ गठीत केल्यापासून नितीन गडकरी Nitin Gadkari आणि त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची चर्चा ही नेहमीच होत आली आहे. 

यापूर्वीच्या मोदी सरकारमध्ये गडकरींकडे रस्ते, परिवहन व महामार्ग, जहाजबांधणी आणि गंगा पुनरुत्थान ही खाती देण्यात आली होती. यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत आपल्या कामाची चमक दाखवीत चांगली छाप सोडली. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या खातेवाटपात त्यांच्याकडील गंगा पुनरुत्थान आणि जहाजबांधणी ही खाती काढून सूक्ष्म आणि मध्यम लघुउद्योग हे खाते देण्यात आले. त्यावेळीही गडकरी आणि त्यांना देण्यात आलेली खाती यांवर चांगलीच चर्चा झाली. आता काल नवीन ४३ जणांना मंत्रिमंडळात सामावून घेत असताना गडकरींकडील सूक्ष्म आणि मध्यम लघुउद्योग हे खाते काढून घेण्यात आले आणि ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे देण्यात आले. हे खाते गडकरींकडून काढून राणेंकडे का देण्यात आले, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण आज गडकरींकडे रस्ते, परिवहन व महामार्ग हे एकच खाते आहे.

चर्चा तर होणारच...
मंत्रिमंडळ गठीत करताना किंवा मंत्रिमंडळात फेरबदल करताना गडकरींच्या खात्यांमध्ये नेहमी बदल झाले आहेत आणि त्यावर चर्चाही घडून आली आहे. काल मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर लगेच त्यांचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न तर होत नाहीयेत ना.., अशा चर्चा झडू लागल्या. पण तसे काहीही नसून नवीन लोकांना सामावून घेण्यासाठी आणि कारभार अधिक गतिमान करण्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याची वस्तुस्थिती पुढे आली. गडकरींचे महत्व कमीच जर करायचे असते, तर त्यांच्याकडील अतिमहत्त्वाचे आणि जवळपास ६ लाख कोटी रुपयांचे असलेले रस्ते, परिवहन व महामार्गे हे खाते काढून घेण्यात आले असते. किंवा ‘त्या’ १२ मंत्र्यांप्रमाणे अगदी राजीनामासुद्धा मागण्यात आला असता. पण तसे काहीही घडलेले नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचे महत्व वगैरे अजिबात कमी झालेले नाही. १२ मंत्र्यांना जरी डच्चू दिला असला तरी बव्हंशी मंत्र्यांकडे असलेले अतिरिक्त खाते काढून नवीन लोकांना ‘ॲडजेस्ट’ करण्यात आले आहे. पण राज्यात असतानापासून ‘रोडकरी’ हे बिरुद त्यांच्या नावाला लागले. त्यामुळे त्यांच्याबाबतीत काही घडामोड झाली, तर चर्चा तर होणारच...

केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ८१ मंत्री होऊ शकतात. सद्यःस्थितीत ३० कॅबिनेट मंत्री, ४५ राज्यमंत्री आणि २ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत. अजूनही तीन नव्या लोकांना सामावून घेण्याची व्यवस्था नरेंद्र मोदींनी ठेवलेली आहे. येणाऱ्या काळात जर असे झाले, तर अजूनही काही मंत्र्यांकडील खाती कमी करण्यात येतील. 

७ वर्षांत चमकदार कामगिरी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन आणि महामार्ग या खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करीत असताना गडकरींनी चमकदार कामगिरी केली आहे. केंद्र सरकारकडे जगाला दाखवण्यासारखी जी काही कामे असतील, त्यामध्ये देशातील रस्ते ही प्रमुख बाब आहे. गेल्या ७ वर्षात काश्‍मीर, हिमाचल प्रदेश ते बांगलादेशच्या सीमेपर्यंत, इकडे पाकिस्तान सीमेपर्यंत आणि कन्याकुमारीपर्यंत त्यांच्या मंत्रालयाने महामार्गांची, बोगद्यांची कामे केली आहेत, ती चमकदार आहेत. 

कोरोना काळातही उत्कृष्ट कामगिरी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र खाटा, ऑक्सिजन, इंजेक्शन्स, ॲम्बूलन्सचा तुटवडा असताना नितीन गडकरींनी पुढाकार घेतला. त्यांचे स्वतःचे हे मंत्रालय नसतानाही त्यांनी धडाडीने कार्य करीत उपरोक्त सर्व बाबींची पूर्तता केली. इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनच्या पूर्ततेसाठी शासनाकडून संबंधितांना धडाधड परवानगी काढून दिल्या. त्यासाठी त्यांनी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत ‘फास्ट कम्यूनिकेशन’ केले. त्यामुळेच जनतेला दिलासा मिळाला. त्यांची ही कामगिरीही चमकदार अशीच म्हणावी लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com