वीज पडून सर्व बेचिराख झालं, पण ‘त्यांनी’ सोशल मिडीयातून उभारली मोठी मदत... - the power went out and every went awry they raised help through social media | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

वीज पडून सर्व बेचिराख झालं, पण ‘त्यांनी’ सोशल मिडीयातून उभारली मोठी मदत...

संदीप रायपूरे 
गुरुवार, 8 जुलै 2021

एका गरीब शेतकऱ्यावर आलेल्या बिकट प्रसंगाची माहिती मिळाल्यानंतर माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरातील भुमीपूत्र प्रतिष्ठान यांनीही प्रत्येकी दहा हजार रूपयांची मदत केली.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : शेतात राबणाऱ्या गरीब शेतकरी कुटूबांच्या घरावर विज पडली. अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं. घटनेची माहिती मिळाली ते धावतपळत घरी पोहोचले. पण सारच जळून खाक झालं होतं. but it was burnt to ashes या अनपेक्षित घटनेनं कुटुंब पुरत हादरलं. शेतीच्या हंगामात आलेल्या या संकटाने दुखाःचा डोंगर उभा राहिला. अशा कठीण प्रसंगी दोन संवेदनशील तरूणांनी समाजमाध्यमाचा आधार घेत पुढाकार घेतला. two young people took initiative based on social media अन शेकडो दानशुरांनी लाखमोलाची मदत करित औदार्य दाखवले. आज त्या कुटुंबियांना मदत देण्यात आली. यावेळी भावूक झालेल्या त्या कुटुंबियांना बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील प्रदीप भोयर हा आपल्या कुटुंबासमवेत शेतीच्या कामात व्यस्त होता. अचानकपणे निसर्गाने रौद्ररूप धारण केले. अन् भोयर कुटुंबाच्या घरावर वीज पडली. क्षणात सारंच बेचिराख झालं. घरात ठेवलेले धान, शेतीसाठी खरेदी केलेल्या खताची पोती, लाकडी पेटीत ठेवलेली तीस हजार रूपयांची रक्कम. क्षणार्धात सारच जळून खाक झालं.आपल्या घरावर वीज पडली अन आग लागली ही माहिती कळताच पूर्ण कूटुंब धावतपळत घरापर्यत पोहचलं. पण तोपर्यत सारच संपल होतं. या अस्मानी संकटान भोयर कुटुंब पुरत हादरलं. आता आपल कस होईल, या चिंतेने त्यांची झोप उडाली.

घटनेची माहिती क्षणभरात समाजमाध्यमातून समोर आली. अशा कठीण प्रसंगी गोंडपिपरी यंग बिग्रेडचे संस्थापक अध्यक्ष सुरज माडूरवार, युवा कार्यकर्ता अनिकेत दुर्गे यांनी पुढाकार घेतला. अन् समाजमाध्यमातून मदतीचे आवाहन केले. दिवसभरात त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. शेकडो दानशुरांनी लाखमोलाची मदत केली. आज सुरज माडूरवार, अनीकेत दुर्गे, समीर निमगडे, राकेश पून, सुनील फुकट, नितेश मेश्राम, तिरूपती झाडे, सरपंच अंकुर मल्लेलवार, गोकुल सोनटक्के यांच्या उपस्थितीत साठ हजार रूपये रोख, बारा हजार रूपयांचे किराणा साहित्य, भांडे, मुलांसाठी शालेय साहित्य वितरीत करण्यात आले.

सुधीर मुनगंटीवारांचीही मदत
एका गरीब शेतकऱ्यावर आलेल्या बिकट प्रसंगाची माहिती मिळाल्यानंतर माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरातील भुमीपूत्र प्रतिष्ठान यांनीही प्रत्येकी दहा हजार रूपयांची मदत केली. विठठलवाडाचे संरपंच अंकुर मल्लेलवार यांनी शंभर किलो गहू तर जितेश वेगीनवारनी शंभर किलो तांदुळ दिले. याशिवाय तालुक्यातील शेकडो लोकांनी आर्थीक मदत करित औदार्य जोपासले.

हेही वाचा : बीएचआर प्रकरण : संशयित आमदार पटेल सापडेनात 

एका गरीब शेतकऱ्यावर आलेल्या अस्मानी संकटनं कुटुंब पुरत हादरलं. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही समाजमाध्यमाचा योग्य वापर केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आम्ही त्या कुटुबाला प्रत्यक्ष मदत दिली.
सूरज माडूरवार, अध्यक्ष, गोंडपिपरी यंग ब्रिगेड.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख