आजचा वाढदिवस : यशोमती ठाकूर 

३० डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेश वानखडे यांचा त्यांनी पराभव केला. त्यांनी यशवर्धन हा मुलगा आणि आकांक्षा ही मुलगी आहे. मुले लहान असतानाच त्यांचे पती राकेश सोनवने यांचे निधन झाले.
Aajcha Wadhdiwas - Yashomati Thakur
Aajcha Wadhdiwas - Yashomati Thakur

नागपूर : यशोमती ठाकूर यांचा जन्म अमरावती येथे १७ मे १९७३ मध्ये झाला. तिवसा मतदारसंघाचे माजी आमदार भय्यासाहेब ठाकूर यांच्यापासूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. वडिलांच्या नेतृत्वात त्या तयार झाल्या. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा तीनही भाषांवर प्रभुत्व असलेल्या अ‍ॅड. यशोमती ठाकूर पहिल्यांदा २००९ मध्ये तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी सातत्याने हा मतदारसंघ राखला आहे. 

काँग्रेसच्या निष्ठावान नेत्या, राहुल ब्रिगेडच्या खंद्या कार्यकर्त्या, आक्रमक नेतृत्व, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता तसेच प्रचंड जनसंपर्क ही त्यांची बलस्थाने आहेत. त्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळात आरोग्य तसेच फ्रंटलाईनवर काम करणा-यांना सातत्याने बळ देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. अमरावती जिल्ह्याच्या तिवसा विधानसभा मतदारसंघातून सलग ३ वेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर त्या आमदार झाल्या आहेत. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या महिला व बालविकास या विभागाच्या मंत्री आहेत. 

३० डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेश वानखडे यांचा त्यांनी पराभव केला. त्यांनी यशवर्धन हा मुलगा आणि आकांक्षा ही मुलगी आहे. मुले लहान असतानाच त्यांचे पती राकेश सोनवने यांचे निधन झाले. मुलांचे संगोपन करतानाच त्या समाजकारण आणि राजकारणात सक्रिय राहिल्या आणि आज कॅबिनेट मंत्री आहेत.


Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com