साठा संपला : पुण्यात लसीकरण मोहीम सोमवारी बंद

शासनाकडून नव्याने लस पुरवठा करण्यात आलेला नाही.
corona.jpg
corona.jpg

पुणे : महापालिकेकडे कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसीचे डोस संपले असून, शासनाकडून नव्याने लस पुरवठा करण्यात आलेला नाही. परिणामी उद्या (सोमवारी) शहरातील सर्व लसीकरण मोहीम बंद राहणार आहे.(Stocks out: Vaccination drive in Pune closed on Monday)

गेल्या आठवड्यात महापालिकेला शासनाकडून मिळालेले कोव्हीशील्ड लसीचे २८ हजार डोस शुक्रवारीच संपले.३ हजार कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध असल्याने त्याचे शनिवारी आणि रविवारी नियोजन केले होते. ही लस आज संपली.रविवारी शासनाकडून लस पुरवठा झालेला नसल्याने पालिकेने सोमवारी सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन जाहीर केले जाईल, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान,सध्या शहरात ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांचे फक्त दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू होते. १६ जानेवारी ते १५ मे पर्यंत शहरात सर्व वयोगटांमध्ये पहिला व दुसरा डोस मिळून ९ लाख ४६ हजार जणांना लस दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतही सोमवारी लसीकरण बंद
अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उद्या सोमवार दिनांक १७ मे २०२१ रोजी मुंबईत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातील कोविड-१९ लसीकरण पूर्णतः बंद राहणार आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com