लेखापरीक्षण अहवालावर महापौरांशी केव्हाही चर्चा करायला तयार : पप्पू देशमुख

मनपाच्या आजच्या आमसभेत नगरसेवकांनी जुळू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. पहिले पंधरा मिनिट ऑनलाइन यंत्रणाच सुरू झाली नाही. शेवटच्या पाच मिनिटात नगरसेवक जुळले. परंतु एकालाही सभेत बोलता आले नाही.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या Chandrapur Municipal Corporation विविध कामांवर गंभीर असे लेखा आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या आक्षेपानुसार विविध कामात एकूण २०० कोटींचा अपहार झाल्याची प्राथमिक माहिती Preliminary information that a total of Rs 200 crore was embezzled in various works पुढे आली आहे. २०१५-१६ दरम्यानच्या ७१ कामांवर औरंगाबाद येथील लेखा परीक्षक पथकाने हे आक्षेप नोंदविले आहेत. सत्ताधारी भाजपच्या महापौर राखी कंचर्लावार Ruling BJP mayor Rakhi Kancharlawar लेखापरीक्षण अहवाल प्रशासकीय बाब म्हणून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शहरविकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख Urban Development Front group leader Pappu Deshmukh यांनी केला आहे. लेखापरीक्षण अहवालावर महापौरांशी जाहीर चर्चा करायला तयार असल्याचे आव्हान त्यांनी दिले.

महापौरांच्या दोन्ही कारकिर्दीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार किंवा अनियमितता होणे योगायोग नाही. याचा अर्थ त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नसावे किंवा त्यांनी प्रशासनासोबत संगनमत करून जनतेच्या कराच्या पैशाचा दुरुपयोग केला असावा. या संपूर्ण प्रकरणाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी. चौकशी होईपर्यंत नैतिकतेच्या आधारावर महापौर कंचर्लावार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. महानगर पालिकेने सन २०१५-१६ मध्ये केलेल्या विविध कामांमध्ये तब्बल २०० कोटींची अनियमितता झाल्याचे लेखा परीक्षण अहवालातून समोर आल्यानंतर आता विरोधकांनी महापौर राखी कंचर्लावार यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू केले. 

आज सोमवारला मनपाच्या आमसभेत हा अहवाल ठेवण्यात आला. मात्र सत्ताधारी पक्षाने लेखापरीक्षण अहवाल ही प्रशासकीय बाब असल्याचे सांगून अवघ्या २० मिनिटात सभा गुंडाळली. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी निदर्शने केली. महापौर कंचर्लावार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या अहवालाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असे निवेदन आयुक्तांना दिले. सन २०१५-१६ मध्ये महापौर पदी राखी कंचर्लावार आणि आयुक्त सुधीर शंभरकर होते.  त्यामुळे आता विद्यमान महापौर कंचर्लावार यांना विरोधकांकडून लक्ष्य जात आहे. अहवालावरून सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्याची रणनीती विरोधकांना आखली होती. 

सभेच्या सुरुवातीला नगरसेवक धनराज सावरकर यांनी पाणी टंचाईचा मुद्दा लावून धरला. महापौर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागात टँकर पाठवितात, असा सावरकरांचा आरोप होता. शिवसेनेचे गटनेते सुरेश पचारे यांनीही हाच प्रश्न  मांडला. त्यावेळी महापौरांनी शहरातील नागरिकच रेन हार्वेस्टिंग करीत नाही. त्यामुळे भूगर्भातील जलसाठा कमी झाला, असा तर्क सभागृहात  मांडला. भाजपचे गटनेते वसंता देशमुख यांनी महापौरांचा हा तर्क खोडून काढला. रेन हार्वेस्टिंग केलेल्या नागरिकांना सहा महिन्यांपासून अनुदान मिळत नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर नगरसेवक पप्पू देशमुख यांनी शहरात किती टँकर सुरू आहे. कितीची आवश्यकता आहे. याचा लेखाजोखा मांडला. 

एका टॅंकरसाठी रोज एक हजार रुपयांची गरज आहे. त्यासाठी मनपाकडे पैसे नाही. प्रसिद्धीच्या कामावर दररोज सात हजार रुपये मनपा खर्च करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. हा आरोप महापौर कंचर्लावार आणि स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. पैसे कुठे खर्च करायचे आम्ही बघून घेऊ, असे सांगून त्यांनी प्रसिद्धीच्या विषयाला बगल दिली. त्यानंतर काँग्रेसचे गटनेते सुरेश महाकुलकर यांना लेखापरीक्षण अहवालाचा विषयाला हात घातला. परंतु लेखापरीक्षण हा विषय प्रशासनाचा आहे, असे सांगून महापौरांनी सभा गुंडाळली. यावेळी मनपा पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर विरोधकांना मूर्ख बनविल्याचे भाव होते. परंतु लवकरच हा त्यांचा भ्रम दूर झाला. कॉंग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी निदर्शन केली. 

महापौरांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मनपा दणाणून सोडली. त्यानंतर या लेखापरीक्षण अहवालाची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे संयुक्त निवेदन नगरसेवकांनी आयुक्तांना दिले. निवेदनावर डॉ. महाकुलकर यांच्यासह नगरसेवक सुनीता लोढीया, नंदू नागरकर, प्रशांत दानव, अशोक नागापूरे, विना खनके, सकीना अंसारी, अली अहमद  मन्सुरस, संगीता भोयर, ललिता रेवल्लीवार, निलेश खोब्रागडे, कल्पना लहामगे, देवेंद्र बेले, कुशल पुगलिया, पप्पू देशमुख यांच्या स्वाक्षरी आहेत. मनपाच्या आजच्या आमसभेत नगरसेवकांनी जुळू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. पहिले पंधरा मिनिट  ऑनलाइन यंत्रणाच सुरू झाली नाही.  शेवटच्या पाच मिनिटात नगरसेवक जुळले. परंतु एकालाही सभेत बोलता आले नाही.  जाणीवपूर्वक आवाज बंद केल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. 

चुकीचे आरोप करणारे अज्ञानी : महापौर कंचर्लावार
लेखापरीक्षण ही प्रशासकीय बाब आहे. मी महापौर असताना कॉंग्रेसचे सभापती होते. राजकारणासाठी टिका करणे योग्य नाही. आरोप करणाऱ्यांनी महानगर पालिका कायद्याचे पुस्तक वाचावे. असे चुकीचे आरोप करणारे अज्ञानी आहेत, असे महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com