रामराज्य म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली शिवशाही !

इलेक्ट्रिक वाहननिर्मितीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. यातूनही हजारो तरुणांना रोजगार मिळेल. नागपूरच्या विकासाचा सर्वांगीण विचार यातून व्हावा. प्रत्येक क्षेत्रात काम करण्यास वाव आहे. सर्वांनी त्या दिशेने काम केले तर नागपूरचा विकास होईल.
Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर : स्वातंत्र्यानंतर सुराज्य निर्माण करण्याचा विचार ज्या महापुरुषांनी दिला, त्या दिशेनेच आमचे प्रयत्न आहेत. सुराज्य म्हणजेच रामराज्य आणि रामराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली शिवशाही. अशा राज्यात गरिबांचे कल्याण व्हावे, त्यांना न्याय मिळावा, बेरोजगार तरुणांच्या हातांना काम मिळावे, प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा देणारे राज्य म्हणजेच रामराज्य होय, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी आज म्हणाले. 

फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे सातव्या युथ एम्पॉवरमेंट समीट 2021 चे उद्घाटन श्री गडकरींच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे संयोजक माजी आमदार प्रा. अनिल सोले, महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर देशमुख व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे विदर्भातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. मात्र आता ज्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध आहे, अशा क्षेत्राचा अभ्यास करून कौशल्य विकास करून रोजगार कसा निर्माण होईल, याचा आपण प्रयत्न करीत आहोत. फॉर्च्युन फाऊंडेशननेही आता स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बेरोजगार तरुणांना दृष्टी देण्याचे कार्य फाँर्च्युनतर्फे केले जात आहे. हे कार्य खूप अवघड आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले, मिहान प्रकल्पात आतापर्यंत 56 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. मेट्रोच्या माध्यमातून 10 हजार तरुणांना रोजगार मिळाला आणि आता ब्रॉडगेज मेट्रोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात 100 कोटींचा इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प टाटा सुरू करणार आहेत. इलेक्ट्रिक वाहननिर्मितीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. यातूनही हजारो तरुणांना रोजगार मिळेल. नागपूरच्या विकासाचा सर्वांगीण विचार यातून व्हावा. प्रत्येक क्षेत्रात काम करण्यास वाव आहे. सर्वांनी त्या दिशेने काम केले तर नागपूरचा विकास होईल, असेही ते म्हणाले. फॉर्च्युन फाउंडेशनने आता खादी ग्रामोद्योग, एमएसएमईच्या योजनांची माहिती घेऊन, हस्तकला, हातमाग उद्योगांच्या माध्यमातून स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अधिक अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प स्थापित करणारा भारत जगातील चौथा देश
अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात अधिकाधिक प्रकल्प स्थापित करणारा भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे. सौर ऊर्जेमुळे उद्योग क्षेत्राचा गतीने विकास शक्य आहे. हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने जागतिक स्तरावर मुबलक सौर ऊर्जा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’चा प्रस्ताव दिला असून ‘सन वन वर्ल्ड वन ग्रिड’ तसेच ‘वर्ल्ड सोलर बँक’ ही संकल्पना सुचविली असल्याचे गडकरींनी सांगितले.

इंडियन पीपल फोरम आणि यूएईतर्फे आयोजित आत्मनिर्भर भारत- सौर ऊर्जा व एमएसएमईत संधी, या विषयावर ना. गडकरी बोलत होते. ते म्हणाले, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. प्रगती करण्याची खूप क्षमता असलेले हे क्षेत्र आहे. वास्तविक सर्व शासकीय कार्यालयांवर रुप टॉफ सोलरची व्यवस्था व्हावी. यामुळे वीजबिलावर होणाऱ्या प्रचंड खर्चात बचत होईल. जागतिक बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे एमएसएमईंना रूफटॉप प्रकल्प देण्याचा कार्यक्रम आखला आहे. कोविड-19 मुळे संपूर्ण जगाला फटका बसला. 

अर्थव्यवस्था यातून सावरण्याच्या दृष्टीने शासनाने 20 लाख कोटींचे पॅकेज दिले. यांपैकी 3 लाख कोटी एमएसएमईला उपलब्ध करून देण्यात आले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एमएसएमई क्षेत्रासाठी सौर ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे शासनाचे धोरण असून वीज आकार खूप जास्त असल्यामुळे रूफ टॉप सोलरमुळे ही समस्या सुटणार असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, रूप टॉपमुळे एमएसएमईंची ऊर्जा बचत होणार आहे. तसेच वापरात नसलेल्या जागेचा उपयोग उद्योगांना करता येणार आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर ती वीज विकण्याचे स्वातंत्र्यही उद्योगांना आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com