‘नाही कुठेही गजर टाळ’; तेजसने मांडली भक्तांच्या भावबंधांची घालमेल...

हा भाव कलेतून सादर करताना या कलावंतांनासुद्धा गलबलून आले होते. आतातरी महामारीचे हे संकट जगावरून टळू दे आणि पुन्हा भक्तांची मांदियाळी जमू दे, अशी आर्त हाक अभंगाच्या माध्यमातून विठुरायाला दिली आहे.
Pandharpur
Pandharpur

नागपूर : आषाढी वारीवर कोरोना महामारिचे संकट आहे. त्यामुळे विठुरायाचे अगणित भक्त आपापल्या घरातूनच विठुरायाचे स्मरण करीत आहेत. वारकऱ्यांनी तुडूंब, आनंददायी, भगव्या पताकांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनीसुद्धा आज शासकीय महापूजा केल्यानंतर माउलीला घातले. विठुरायाच्या प्रत्येक भक्ताच्या मनातील भावबंधाची घालमेल तेजस माहुरे या गायकाने व्यक्त केली आहे एका अभंगातून... Singer Tejas Mahure expressed the emotions with abhang. 

विठ्ठलाची वारी झाली नसल्यामुळे भक्तांचे मन खट्टू झाले आहे. प्रबळ इच्छा असतानासुद्धा कोरोनाच्या महामारीचे निर्बंध असल्यामुळे वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नाही. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातील घालमेल व्यक्त करताना म्हटले की, ‘पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटू दे, वारकऱ्यांनी तुडूंब, आनंददायी, भगव्या पताकांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे.’ अगदी याचप्रमाणे प्रत्येक भक्ताच्या मनातही घालमेल झाली. 

तेजस माहुरे या उदयोन्मुख गायकाने अभंगातून आषाढी एकादशीच्या या शुभ पर्वावर, सद्य स्थितीतून भाविकांच्या मनातील भावबंधाची होत असलेली घालमेल आणि त्या बंधनातून मुक्ती मिळण्याची एक आर्त विनवणी या अभंगाच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वकाही पूर्ववत व्हावे, हेच कलावंतांनी आपल्या कलेतून सादर केले आहे. अरुण सांगोळे, तेजस माहुरे आणि संकेत जोशी या टिमने आपल्या कलेतून प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या मनातील भाव व्यक्त केले आहेत. 

नाही कुठेही गजर टाळ, चिपळ्यांचा नाद,
येवो भक्तांचीही साद तुझ्या कानी…
झाल्या सुनसान वाटा, नाही पताका आकाशी,
एक तूच अविनाशी, पांडुरंगा, पांडुरंगा…
प्रभो, वाहो सदा सौख्य, गंध सुमनांना येवो,
तारिले संकटी आम्हा, दिधलास भरूनी पान्हा,
वाहते… ठेवुनी वारे, बंदिस्त उघडली दारे…
ही कृपा तुझी माउली, तूच सावली, तुझ्या पावली जीव अर्पिला…

हा भाव कलेतून सादर करताना या कलावंतांनासुद्धा गलबलून आले होते. आतातरी महामारीचे हे संकट जगावरून टळू दे आणि पुन्हा भक्तांची मांदियाळी जमू दे, अशी आर्त हाक अभंगाच्या माध्यमातून विठुरायाला दिली आहे. तेजस हा यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील रहिवासी आहे. त्याचे वडील प्राध्यापक विनीत माहुरे यांच्याकडून त्यांने बालपणापासून संगिताचे धडे गिरवले आहेत. ‘आमच्या मनातील भाव, जसेच्या तसे सादर केल्याबद्दल समाधान आहे’, अशा प्रतिक्रिया विठुमाऊलीचे भक्त व्यक्त करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com