खासदार बाळू धानोरकरांच्या धमण्यांमध्ये शिवसेनेचे रक्त : खासदार राऊत - shivsenas blood in mp balu dhanorkars arteries said mp Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

खासदार बाळू धानोरकरांच्या धमण्यांमध्ये शिवसेनेचे रक्त : खासदार राऊत

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

इस्राईलच्या पेगासस स्वॉफ्टवेयरच्या माध्यमातून जगभरातील ५० हजारांवर लोकांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. त्यात भारतातील किमान ४० महत्वाच्या लोकांचे फोन टॅप करण्यात आले आहेत.

नागपूर : ‘पेगासस’ जासुसी प्रकरणामुळे दोन दिवसांपासून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. संसदेचे कामकाज सतत स्थगित होत आहे. यासाठी शिवसेनेच्या लेटरहेडवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला Om Birla यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या खासदारांसोबत कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर Balu Dhanorkar is the on MP of Congress from Maharashtra हेसुद्धा होते. मग साहजिकच हा प्रश्‍न उपस्थित झाला. तेव्हा खासदार बाळू धानोरकर हे कॉँग्रेसचे खासदार असले तरी त्यांच्या धमण्यांमध्ये शिवसेनेचे रक्त आहे, असे शिवसेना नेते खासदार विनायक राऊत Shivsena Leader MP Vinayak Raut म्हणाले. 

यावेळी खासदार राऊत म्हणाले, सरकारकडून न्यायाची अपेक्षा असते तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो. त्यात धानोरकर सोबत असतातच. राज्यात आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे शिष्टमंडळ कोणाचे हा विषय नाही, न्याय होणे महत्वाचे आहे. भारतीय संविधानाने स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा मौलिक अधिकार दिला असताना पेगासस स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील ठरावीक महत्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले आहे. या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) गठीत करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर व शिवसेनेच्या संसदीय गटाने आज लोकसभाध्यक्षांकडे केली आहे.

शिवसेना आणि खासदार बाळू धानोरकर..
शिवसेनेच्या शिष्टमंडळात आज कॉँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर होते. ते सातत्याने शिवसेनेच्या खासदारांसोबत वावरत असतात. लोकसभाध्यक्षांना शिवसेनेच्या लेटरहेडवर निवेदन देण्यात आले. यासंदर्भात धानोरकर यांना विचारले असता ते म्हणाले, शिष्टमंडळ कोणाचे आहे, हे महत्वाचे नाही. विषय अत्यंत गंभीर आहे. कॉँग्रेसही जासुसी प्रकरणाची चौकशी व्हावी, म्हणून सरकारला जाब विचारत आहे. तसेही कॉँग्रेस आणि शिवसेना ही महाविकास आघाडी सरकारचा भाग आहे आणि महाराष्ट्रात एकत्र आहेत. 

‘पेगासस’ जासुसी प्रकरणामुळे दोन दिवसांपासून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील कामकाज त्यामुळे स्थगित होत आहे. शिवसेनेच्या संसदीय दलाने आज दुपारी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन जेपीसी गठीत करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे लोकसभा नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बिरला यांची भेट घेतली. शिष्टमंडळात गजानन किर्तीकर, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, कृपाल तुमाने, धैर्यशील माने आणि सदाशिव लोखंडे याशिवाय कॉँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा समावेश होता. यावेळी शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, इस्राईलच्या पेगासस स्वॉफ्टवेयरच्या माध्यमातून जगभरातील ५० हजारांवर लोकांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. त्यात भारतातील किमान ४० महत्वाच्या लोकांचे फोन टॅप करण्यात आले आहेत. त्यात विरोधी पक्ष नेते, मंत्री, संपादक, पत्रकार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उद्योगपती, सुरक्षा संघटनेतील विद्यमान आणि माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी सरकारला घेरले. विरोधकांकडून करण्यात आलेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सातत्याने तहकूब करण्यात आले.

हेही वाचा : कोण करतंय आमदार ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची तयारी ?

काय आहे ‘पेगासस’?
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून भारतातील अनेक पत्रकार, नेते आणि अन्य महत्वाच्या लोकांचे फोन हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. जगभरातील महत्त्वाचे सुमारे ५० हजार मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा दावा आहे. ‘पेगासस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्राईलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९ मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख