कोण करतंय आमदार ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची तयारी ?

नाना पटोले नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढले होते. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते नागपूर शहराकडे जातीने लक्ष देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अद्याप त्यांनी नागपूरच्या संघटनेकडे फारसे लक्ष दिलेले नाही.
Vikas Thakre - Gudhe - Wanve
Vikas Thakre - Gudhe - Wanve

नागपूर : नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे President of Nagpur City Congress MLA Vikas Thakre यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक सरसावले आहेत. शहरातील काही नेत्यांनी त्यासाठी नुकतीच दिल्लीवारी केली असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील H.K. Patil यांची भेट घेऊन या नेत्यांनी संघटनेत फेरबदल करण्याची मागणी केली असल्याचे सूत्र सांगतात. Sources said that these leaders have demanded a reshuffle in the organization. 

महापालिकेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने शहराध्यक्ष आमदार ठाकरे यांच्या विरोधात पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाले आहेत. विकास ठाकरे सात वर्षांपासून शहराध्यक्ष आहेत. त्यांच्याच नेतृत्वात मागील महापालिकेची निवडणूक लढली होती. ते आता आमदार झाले आहेत. त्यामुळे शहराची जबाबदारी नव्या नेत्याकडे सोपवण्यात यावी. या माध्यमातून थेट ठाकरे यांनाच शहराध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे, नरेंद्र जिचकार, सेवादलाचे संघटक के.के. पांडे, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे आदींच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभारी पाटील यांची भेट घेतली. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत काँग्रेसचे फक्त २८ नगरसेवक निवडून आले होते. उमेदवारी वाटपावरून त्यावेळी प्रचंड गटबाजी उफाळून आली होती.

एका जाहीर सभेत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली होती. काँग्रेसच्या असंतुष्ट गटाचे नेतृत्व करणारे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना याच कारणामुळे काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबितसुद्धा करण्यात आले होते. ठाकरे समर्थक आणि पक्षांतर्गत विरोधक यांच्यातील दुरावा आजही कायम आहे. ठाकरे पुन्हा अध्यक्षपदी कायम राहिले तर महापालिकेच्या निवडणुकीत आपला ‘गेम' करतील अशी भीती त्यांना सतावत आहे. हे लक्षात घेऊन सात वर्षांचा कार्यकाळ झाल्याने नव्या अध्यक्ष नेमण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. प्रदेश प्रभारी पाटील यांना नागपूर शहरात वैयक्तिक लक्ष देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे समजते. 

हेही वाचा : मिहानमधील आपत्ती व्यवस्थापन केंद्रामुळे टाळता येईल शेतकऱ्यांचे नुकसान...
 
सात वर्षांपासून निवडणूक नाही 
नाना पटोले नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढले होते. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते नागपूर शहराकडे जातीने लक्ष देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अद्याप त्यांनी नागपूरच्या संघटनेकडे फारसे लक्ष दिलेले नाही. मध्यंतरी त्यांनी राज्यस्तरीय संघटनेचा आढावा घेतला होता. या दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील नेतृत्वाबाबत सूचना मागवल्या होत्या. सात वर्षांपासून नागपूर शहराची संघटनात्मक निवडणूक झालेली नाही. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com