वसंता देशमुख यांच्या आडून सुधीर मुनगंटीवारांना डिवचण्याचा प्रयत्न...

आता देशमुख यांच्या पाठीशी जिल्ह्यातील आणि बाहेरील भाजपचे काही नेते उभे झाले असून यानिमित्ताने आमदार सुधीर मुनगंटीवार यांना डिचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी चर्चाभाजपच्या वर्तुळात आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेतील भाजपचे गटनेते वसंता देशमुख Group Leader of BJP Vasanta Deshmukh यांना पदावरुन हटविण्याची तयारी अंतिम टप्यात आहे. दुसरीकडे देशमुख यांनी आज बुधवारला नागपूर येथे जावून विभागीय उपायुक्तांची भेट घेतली. Meeting with Divisional Commissioner काही वकीलांच्याही गाठीभेटी घेतल्या. त्यांच्या विरोधातील कारवाईला ते कायदेशीर आव्हान देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान आता देशमुख यांच्या पाठीशी जिल्ह्यातील आणि बाहेरील भाजपचे काही नेते उभे झाले असून यानिमित्ताने आमदार सुधीर मुनगंटीवार यांना डिचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. 

 सहा महिन्यापूर्वी देशमुख यांना मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाचे आश्वासन मिळाले होते. त्यासाठी त्यांचा सभागृह नेते पदाचा राजीनामा घेतला. परंतु एेनवेळी रवि आसवानी यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली. तेव्हापासून देशमुख नाराज आहे. आठ दिवसांपूर्वी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आठ सदस्य स्थायी समितीतून निवृत्त झाले. निवृत्त सदस्यांमध्ये सभापती आसवानी यांचाही समावेश आहे. त्यामुळे नव्या सदस्यांच्या नियुक्तीचा विषय आमसभेच्या कामकाज पत्रिकेवर येईल. आपल्या सभापतीपदाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा देशमुख यांना होती. देशमुख यांना भाजपच्या तीन सदस्यांची नावे स्थायी समितीसाठी द्यायची होती. त्यांच्याकडे संदीप आवारी आणि संजय कंचर्लावार यांच्या नावाची शिफारस पक्षनेतृत्वाने केली. परंतु या दोन्ही नावाला देशमुख यांनी विरोध केला. त्यामुळे महापौर राखी कंचर्लावार यांनी नव्या सदस्यांच्या समावेशाच्या विषयला आमसभेच्या कामकाजातून बाद केले. देशमुख आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे त्यांनी गटनेते पदावरून हटविण्याच्या प्रक्रीयेला वेग आला. 

 भाजप आणि मित्र पक्षांच्या नगरसेवकांची बैठक मुनगंटीवार यांनी घेतली. त्यात ३९ पैकी ३४ नगरसेवकांनी देशमुख यांना हटविण्याच्या बाजुने कौल दिला. मुद्रांकावर स्वाक्षऱ्या सुद्धा केल्या. याच व्हिडीआे चित्रिकरण सुद्धा केले. 

देशमुख हे कॉंग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर आणि नगरसेवक नंदू नागरकर यांचे नाव स्थायी समितीत पाठविणार होते, असे आता भाजप नगरसेवकांतर्फे सांगितले जात आहे. मात्र महाकुलकर आणि नागरकर यांचे नाव नियमानुसार आपण पाठवूच शकत नाही, असे देशमुख सांगत आहे. 

 आपली विकेट पडणार हे तीन दिवसांपूर्वी पर्यंत देशमुख यांनीही मान्य केले. मात्र आता अचानक देशमुख यांचा पावित्रा बदलला. ३४ वर्ष पक्षाची सेवा केली.  निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी कायदेशीर लढाईसाठी तयार आहे. नगरसेवकांच्या मुद्रांकावर स्वाक्षरी घेतल्याने काही फरक पडणार नाही. त्यांना विभागीय उपायुक्तांसमोर हजर करावे लागले. त्यामुळे मीच गटनेता राहणार आहे, असा दावा त्यांनी 'सकाळ'शी बोलताना केला. देशमुख यांच्या या आत्मविश्वासामागे जिल्ह्यातील आणि जिल्ह्या बाहेरील काही नेत्यांचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांना त्यांची भेट घेतली होती. भागडिया आणि मुनगंटीवार यांच्यातील सख्य जिल्ह्याला परिचित आहे. त्यामुळे या भेटीची तेव्हा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे देशमुखांनी बदलेल्या पावित्र्यामागे भाजपचे काही नेत्यांची फुस आहे, असे भाजपचे नगरसेवक बोलत आहे. भाजपचे नगरसेवक मुनगंटीवार यांच्या शब्दाबाहेर नाही. त्यामुळे देशमुखांना मोहरा बनवून  डिवचण्याचा प्रयत्न करणारे नेतेच तोंडघाशी पडतील, असे मुनगंटीवार समर्थक सांगत आहे.

Edited By : Atul Mehere 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com