झरी जामणीनंतर आता वणी तालुक्यात आला वाघ, शाळेच्या प्रांगणात आढळले ठसे...

वणी उपविभागात सातत्याने वाघांचा मुक्तसंचार सुरू असतो. झरीजामनी तालुक्यातील पिवरडोल या गावातील अविनाश पवन लेनगुरे या 17 वर्षीय तरुणाला लक्ष केले होते. अशा घटना या परिसरात नेहमीच घडताना दिसत आहे.
Tiger
Tiger

वणी (जि. यवतमाळ) : आठवडाभरापूर्वी यवतमाळ जिल्ह्याच्या झरीजामणी तालुक्यातील पिवरडोल येथील अविनाश पवन लेनगुरे Avinash Pawan Lengure या १७ वर्षीय युवकाला वाघाने ठार केले होते. त्यानंतर तालुक्यात वाघाची दहशत पसरली होती. आता लगतच्या वणी तालुक्यातील साखरा-दरा येथील शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्यानं Footprints found in school premises. परिसरात पुन्हा दहशत पसरली आहे. 

साखरा दरा या गावासह तालुक्यात दहशत पसरविणारी ही बाब  आज दुपारी शाळेतील शिक्षकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. शाळा सद्यःस्थितीत बंद असली तरी परिसरात वाघाच्या मुक्तसंचारामुळे शिक्षक व गावातील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून लोक भयभीत झाले आहेत.  दुपारी वाघाच्या पायाचे ठसे आढळताच शिक्षकांनी याबाबत ग्रामस्थांना सूचित केले. त्याप्रमाणेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या गंभीर बाबीची कल्पना देण्यात आली. पण अद्याप वनविभागाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही. 

पिवरडोलसारखी घटना घडल्यानंतरच वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याचं गांभीर्य कळेल का, असा प्रश्‍न लोक विचारत आहेत. आठवडाभरापूर्वीची घटना ताजी असताना वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे. वणी उपविभागातील तिन्ही तालुक्यांमध्ये वाघांचा संचार सुरू असतो. पण वनविभाग ही बाब फारशी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे वन्यजीव गावांत शिरून मानव आणि प्राण्यांवर हल्ले करतात, असा आरोपही ग्रामस्थ करीत आहेत. 

वणी उपविभागात सातत्याने वाघांचा मुक्तसंचार सुरू असतो. झरीजामनी तालुक्यातील पिवरडोल या गावातील अविनाश पवन लेनगुरे या 17 वर्षीय तरुणाला लक्ष केले होते. अशा घटना या परिसरात नेहमीच घडताना दिसत आहे. अनेक व्यक्तींना जायबंदी तर जनावरांचा फडशा वाघाने पाडला आहे. साखरा-दरा या गावात चक्क शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने मुक्तसंचार करणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com