शेगाव संस्थानचे विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

त्यांचे हे कार्य देशभरातील सर्व संस्थांना व्यवस्थापनशास्त्रातील मार्गदर्शक ठरणारी आहे. राजकीय व्यक्तींमध्ये वरिष्ठांपर्यंत त्यांचे संबंध होते. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
Shivshankarbhau Patil Shegaon
Shivshankarbhau Patil Shegaon

शेगाव (जि. बुलडाणा) : : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील Managerial trusty of shegaon sansthan Shivshankarbhau Patil यांचे दीर्घ आजाराने आज बुधवारी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

गेले काही दिवसांपासून त्यांची प्रकृती "मल्टीऑर्गन फेल्युअर "मुळे  चिंताजनक होती. गेले दोन दिवसांत ती अधिक गंभीर झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नियोजनबद्ध कार्यपद्धती व शिस्तप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवशंकरभाऊंच्या नेतृत्वात श्रीगजानन महाराज संस्थानचा नावलौकिक संपूर्ण देशभर पसरला आहे.

त्यांचे हे कार्य देशभरातील सर्व संस्थांना व्यवस्थापनशास्त्रातील मार्गदर्शक ठरणारी आहे. राजकीय व्यक्तींमध्ये वरिष्ठांपर्यंत त्यांचे संबंध होते. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केला विकास आराखड्यात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाऊंचे मार्गदर्शन हे विकासाकरिता मैलाचा दगड ठरले आहे.

गेल्या 5 ते 6 दिवसांपासून  शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. 'मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका..', असे त्यांनी कुटुंबीयांना सांगून ठेवले होते. त्यामुळे त्यांनी सांगितल्यानुसारच त्यांच्यावर घरीच पूर्ण मेडिकल सेटअपसह ट्रीटमेंट केली गेली. एम डी मेडिसिन डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात डॉक्टरांच्या चमुने त्यांच्यावर उपचार केले.

शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर आयुर्वेदिक उपचारालाच प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात बुलडाणा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही शेगावला बोलविण्यात आले होते. एक कर्मयोगी म्हणून शिवशंकरभाऊ पाटील यांच्या ख्याती सर्वदूर आहे. त्यांच्या मार्गदर्शनात शेगाव संस्थानचे व्यवस्थापन गेल्या कित्येक वर्षांपासून अविरत सुरळीत सुरू आहे. शेगाव संस्थानचे समाजकार्य मोठे आहे. त्यांनी आतापर्यंत समाजोपयोगी अनेक उपक्रम राबविले. आनंद सागर हा भव्य प्रकल्प त्यांच्याच नेतृत्वात यशस्वीपणे राबविण्यात आला. नंतर नंतर काही तांत्रिक अडचणीमुळे आनंद सागर बंद पडले. पण संस्थानतर्फे सुरू असलेले इतर उपक्रम आजही यशस्वीपणे सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com