आजारी संचालकांमुळे बिघडले मेट्रोचे स्वास्थ्य, ‘जय जवान’चा गंभीर आरोप...

एकूणच अधिकाऱ्यांनी आधीच्या दोन वर्षांत सादर केलेले लाखो रुपयांचे बिल संशयास्पद असल्याने याची सखोल चौकशी करावी, ते खोटे असतील तर कारवाई करून रक्कम वसूल करावी.
Prashant Pawar - Nagpur Metro
Prashant Pawar - Nagpur Metro

नागपूर : शहरात ८ हजार ६८० कोटी रुपये खर्चून महामेट्रोतर्फे मेट्रो रेल्वेचा प्रकल्प Project of Metro Railway उभारला जात आहे. पण यामध्ये आता मेडिकल बिलांमध्ये Medical Bills मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप जय जवान जय किसानचे प्रशांत पवार Jay Jawan Jai Kidan's Prashant Pawar यांनी केला आहे. पाचही संचालक सन २०१७ पासून दरवर्षी लाखो रुपयांचे मेडिकल बिल घेत आहेत. या आजारी संचालकांमुळेच मेट्रोचे अर्थकारण बिघडत असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. 

पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, संचालक व अधिकाऱ्यांना वेतन आणि भत्त्यांसह वैद्यकीय बिलांचीही सोय करून देण्यात आली आहे. पण या संचालक या सुविधेचा गैरवापर करीत आहेत. प्रकल्पाचे ४० टक्के काम अजूनही व्हायचे बाकी आहे. पण आतापर्यंत संचालकांनी कोट्यवधी रुपयांची बिले घेतली आहेत. संचालक जर येवढे आजारी असतील तर ते काम कसे करतात? आजारपणात त्यांच्याकडून जबाबदाऱ्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे आणि प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे अशा संचालकांना निवृत्त केले पाहिजे. 

आजारपणावर कोणी किती खर्च करायचा हे ज्याच्या त्याच्या तब्येतीवर अवलंबून असते. महामेट्रोचे पाच प्रमुख अधिकारी दरवर्षी लाखो रुपये खर्च करतात. त्यामुळे आरोग्यावर अवाढव्य खर्च करणारे अधिकारी काम करण्यास खरोखरच सक्षम आहेत की नाही, याकरिता सर्वांची फिटनेस टेस्ट करावी किंवा त्यांनी उचल केलेल्या बिलाचे ऑडिट करावे, अशीही मागणी प्रशांत पवार यांनी केली. महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात ४९ लाख २० हजार, त्यानंतरच्या वर्षांत ६४ लाख तीन हजार तर महेश कुमार यांनी ९ लाख ६६ हजार, ११ लाख ७८, सुनील माथुर यांनी २१ लाख ६५ हजार आणि २१ लाख ७८ हजार, लेखा व वित्त अधिकारी एस. शिवनाथ यांनी १२ लाख २० हजार, १९ लाख १७ हजार आणि रामनाथन सुब्रमनियम यांनी तब्बल ९२ लाख ७१ हजार आणि एक कोटी १३ लाख ७६ हजार रुपये खर्च केले आहेत. 

हे आकडे बघून चक्रावलेल्या जय जवान जय किसान संघटनेने पत्रकार परिषद घेऊन याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांची तब्येत एकदम ठणठणीत झाली. १९-२० या आर्थिक वर्षात दीक्षित यांनी अडीच लाख, महेश कुमार यांनी फक्त ४४ हजार, माथूर यांनी एक लाख ६० हजार, शिवनाथन यांनी ५३ हजार आणि सुब्रमनियम यांनी १० लाख २६ हजार रुपये खर्च केले. ही आकडेवारी महामेट्रोचे राज्यसभेच्या पटलावर ठेवलेल्या अहवालात दिली असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. 

एकूणच अधिकाऱ्यांनी आधीच्या दोन वर्षांत सादर केलेले लाखो रुपयांचे बिल संशयास्पद असल्याने याची सखोल चौकशी करावी, ते खोटे असतील तर कारवाई करून रक्कम वसूल करावी. बिल खरे असेल तर आजारी तसेच काम करण्यास सक्षम नाही असे सांगून सर्वांना निवृत्त करावे, अशी मागणीही प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मिलिंद महादेवकर उपस्थित होते. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com