Congress News: काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार? 'ही' पाच नावं चर्चेत

महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेता बदलण्याची शक्यता आहे.
Congress Flags
Congress FlagsSarkarnama

Congress Latest news Update : गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत पक्षांर्गंत नाराजी दिसून येत आहे. मधल्या काळात पक्षातीलच काही नेत्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला होता. हे प्रकरण काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत गेलं होतं. तेव्हापासून राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली होती. अशातच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress News) मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेता बदलण्याची शक्यता आहे. सुनील केदार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत,बंटी पाटील व अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नेतृत्व बदलाच्या शर्यतीत यशोमती ठाकूर अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वांत पुढे दिसत आहेत.

Congress Flags
Pandharpur Politic's : ‘चंद्रभागा कारखाना लढू नका; विधानसभेला पंढरपूरऐवजी माढ्याचा विचार करा’ : भालके-काळेंकडून अभिजित पाटलांना अटी

याचं कारणही तसेच आहे. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत हे महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नितीन राऊत यांची नजर विधिमंडळ पक्षनेतेपदावर आहे. अशोक चव्हाण यांनी यापुर्वी प्रदेशाध्यक्षपद होते. तर बंटी पाटील यांना अलीकडेच विधान परिषदेतील काँग्रेसचे नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत सध्यातरी यशोमती ठाकूर यांचचं नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

विशेष बाब म्हणजे मराठा अध्यक्ष व दलित विधिमंडळ पक्ष नेता करण्याच्या फॉर्म्यल्यावरही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात हे फेरबदल केले जाऊ शकतात. दरम्यान, काही दिवसांपुर्वी आमदार सत्यजित तांबे यांनी थेट नाव नाना पटोलेविरोधात नाराजी व्यक्त केली होती. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील पत्राद्वारे पक्षश्रेष्ठींकडे पटोलेंसोबत (Nana Patole) काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.

Congress Flags
Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना दिलासा नाहीच ; 'मोदी' बाबतची याचिका फेटाळली ; आता सुप्रीम कोर्टात..

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस लोकसभा निवडणुकीसह आगामी सर्व विधानसभा निवडणुकांचीही तयारी करत आहे. रायपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनातही काँग्रेसमदील पक्ष बांधणीवर आणि फेरबदलांसंदर्भात चर्चा झाली होती. काँग्रेस आठ राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचेही सांगण्यात आले होते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com