Rahul Gandhi on PM Narendra Modi; देशातील संपत्ती एकाच व्यक्तीला का? अदानींवरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल

राहुल गांधींनी यावेळी उद्योगपती गौतम अदानींच्या प्रगतीचा आलेख दाखवत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi | Narendra Modi
Rahul Gandhi | Narendra ModiSarkarnama

Rahul Gandhi questions PM Modi on Adani Group Growth : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. यांमुळे भाजप काँग्रेस यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. काल सुरत न्यायालयाने याचिका फेटळल्यानंतरही अदानी समूहानं २०१४ नंतर केलेल्या प्रगतीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा घेरलं आहे.

Rahul Gandhi | Narendra Modi
Sunstroke Deaths : नितीन करीरांना उगाच बदनाम का करावे, ते सरकारच्या चुकीची चौकशी करतील का? ; राष्ट्रवादीचा सवाल

हिंडनबर्गच्या अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अदानी समूहाच्या कारभारावरच राहुल गांधींनी पंतप्रधानांना (Narendra Modi) प्रश्न विचारले आहेत. राहुल यांनी अदानी व मोदी यांच्या कथित युतीवर निशाणा साधत "एयरपोर्ट सेठ के, पोर्ट सेठ के, बिजली सेठ की, कोयला सेठ का, सड़कें सेठ की, खदानें सेठ की, ज़मीन सेठ की, आसमान सेठ का, सेठ किसका? सेठ ‘साहेब’ का!''असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

या ट्विटसोबतच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी २०१४ पुर्वीच्या गौतम अदानी यांच्या उद्योगांच्या प्रगतीचा आलेख दाखवत मोदी यांना लक्ष्य केलं आहे. त्यांनी २०१४ आधी अदानी यांच्या उद्योग-व्यवसायाची स्थिती काय होती आणि २०१४ नंतर त्यात कशी वाढ झाली याचा आलेखच दाखवत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi News)

"पंतप्रधान म्हणतात सबका साथ सबका विकास पण आज भारत सरकार फक्त एका माणसासोबत उभे असून त्या एकाच माणसाचा पूर्ण विकास सुरु आहे. पहा गौतम अदानी यांचा बिझनेसचा नकाशा, त्यांचा बिझनेस नुसता वाढला नाहीये तर इथे जादूच झाली आहे. थर्मल प्लॅन्ट, सोलर, विंड पॉवर, मायनिंग, डिफेन्स अँड ड्रोन, एअरपोर्ट, पोर्ट्स, गॅस, या सर्व ठिकाणी अदानी आणि फक्त अदानी, पंतप्रधानजी मी पुन्हा एकदा विचारतो देशाची सर्व संपत्ती एकाच व्यक्तीला का दिली जात आहे. याच्यामागे कोणती शक्ती आहे हे कोण करत आहे, हा प्रश्न देशातील प्रत्येक तरुण आणि प्रत्येक नागरिक विचारत आहे. या अदानी समूहावर झालेल्या आरोपांची संयुक्त संसदीय समितीमार्फत (JPC) चौकशी व्हावी, ही मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com