PM Narendra Modi News : पंतप्रधान मोदींच्या हस्ते तब्बल ७१ हजार तरुणांना नियुक्तपत्र मिळणार

Employment News : रोजगार मेळाव्यातून विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न
Naredra Modi
Naredra ModiSarkarnama

Narendra Modi and Employment : रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभागात नियुक्त झालेल्या तब्बल ७१ हजार तरुणांना पंतप्रदान नरेंद्र मोदी नियुक्ती पत्र देणार आहेत. हा कार्यक्रम १३ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदी नोकरी मिळालेल्या तरुणांना मार्गदर्शनही करणार आहेत. दरम्यान, तरूणांना रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मोदी सरकारचा विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याचा एक प्रभावी प्रयत्न आहे.

Naredra Modi
Chandrakant Patil : चंद्रकांतदादा म्हणतात; माझी व्यक्तिगत भूमिका छोट्या महापालिकांच्या बाजूचीच !

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रोजगार मेळावा हा केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त लोकांना रोजगार देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. रोजगार मेळाव्याअंतर्गत अनेक विभागांमध्ये निवड झालेल्या तरुणांना या कार्यक्रमात नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.

Naredra Modi
Pune Municipal Corporation : टेकड्यांवर अतिक्रमण झाले तर जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची; आता कारवाई होणार का?

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी रोजगार मेळावा हा केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे. या माध्यमातून रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकूण एक लाख ४२ नियुक्तीपत्रांचे वाटप पंतप्रधानंच्या हस्ते करण्यात आले होते. सरकारी नोकऱ्या मिळालेल्या तरुणांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदींनी त्यावेळी तरुणांना मार्गदर्शन केले होते.

Naredra Modi
Sharad Pawar News : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंमध्ये तासाभरापासून खलबतं; EVM, जेपीसी, अदानी, आंबेडकरांच्या मुद्यावर चर्चा?

नियुक्तीपत्र दिल्यानंतर देशभरातील तरुणांची भारत सरकार अंतर्गत ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनियर म्हणून नियुक्ती केली जाईल. ड्राफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, नर्स, प्रोबेशनरी ऑफिसर, पीए, एमटीएस अशा विविध पदांवर नियुक्ती केली जाईल.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com