Sharad Pawar Meet CM : शरद पवार मुख्यमंत्री शिंदेची भेट का घेतली? कारण आलं समोर..

Sharad Pawar Meet CM : शरद पवारांच्या भेटीवर मुख्यमंत्री म्हणाले..
Sharad Pawar Meet CM :
Sharad Pawar Meet CM : Sarkarnama

Sharad Pawar Meet CM : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानावर दाखल झाले होते. या भेटीमागे काही राजकीय अर्थ दडले आहेत असे बोलले जात होते. परंतु ही फक्त एक सदिच्छा भेट होती. मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट होती, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. (Sharad Pawar to meet Chief Minister Eknath Shinde)

Sharad Pawar Meet CM :
Joe Biden News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भर कार्यक्रमात पाय अडखळून पडले; नेमकं काय घडलं?

२४ जून रोजी मराठा मंदिर संस्थेचा वर्धापन दिन आहे. या संस्थेचे अध्यक्ष स्वत: शरद पवार आहेत. मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, यासाठी ही भेट होती. ही भेट तब्बल ४० मिनिटे पार पडली.

Sharad Pawar Meet CM :
Ashok Chavan On Loksabha : लोकसभेच्या जागा वाटपाबाबत 'काँग्रेसचा पॅटर्न' काय? ; अशोक चव्हाण म्हणाले...

मराठा मंदिर संस्थेला यंदाच्या वर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे, यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

यावर भाजप नेते व मत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 'शरद पवार यांनी वेैयक्तिक कारणासाठी मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे यांना भेट घेतली. यातून कसलाही राजकीय अर्थ काढावा, असं काही नाही. त्याची आवश्यकता नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com