Vijay Wadettiwar In Matoshree : विजय वडेट्टीवार 'मातोश्री'वर; उद्धव ठाकरेंशी काय चर्चा होणार ?

Uddhav Thackeray News : विरोधी पक्षनेता झाल्यानंतर वडेट्टीवार प्रथमच 'मतोश्री'वर
Uddhav Thackeray, Vijay Wadettiwar
Uddhav Thackeray, Vijay WadettiwarSarkarnama

Mumbai News : विरोधी पक्षनेते झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार प्रथमच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मतोश्री'वर गेले आहेत. राज्यातील बदललेली राजकीय स्थिती आणि पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांत काय चर्चा होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत दाखल झाले. यानंतर रिक्त झालेल्या पदावर महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने दावा सांगितला होता. त्यानुसार विजय वडेट्टीवारांची निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेता होताच वडेट्टीवारांनी आक्रमक भूमिका घेत राज्यातील राजकारणाबाबत दोन बॉम्ब टाकले आहेत. यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार आणि ठाकरेंच्या भेटीत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray, Vijay Wadettiwar
Raj Thackeray Vs Eknath Shinde : मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात 'इंजिन' धडकणार; मनसे लढवणार लोकसभेच्या तीन जागा ?

शरद पवार आणि अजित पवारांच्या पुण्यातील भेटीमुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी अजितदादांनी थोरल्या पवारांना आणण्याची अट भाजपची अट असल्याचा दावा विजय वडट्टेवारांनी केला आहे. यामुळे दोन्ही पवारांच्या भेटीबाबत राज्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या भेटीमुळे ठाकरे गट आणि काँग्रेस सावध झाले असून पवारांनी संभ्रम दूर करावा अशी मागणीही त्यांनी केली होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लक्ष्य करण्यासाठीच भाजपने कॅगचा अहवाल आणल्याचा बॉम्बही वडेट्टीवारांनी टाकल्याने देशभरातून विविध प्रतिक्रिय उमटू लागल्या आहेत. वडेट्टीवार म्हणाले, गडकरींचा काटा काढायचा असून हे अंतर्गत राजकारण आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगने फक्त गडकरींच्या खात्यावर ताशेरे ओढले आहेत. गडकरींची प्रतिमा स्वच्छ, विकासाची आहे. त्यातून त्यांना 'साईड ट्रॅक' करायचे आहे. त्यांचे राजकारण संपवण्याचा डाव असू शकतो."

Uddhav Thackeray, Vijay Wadettiwar
Ajit Pawar Reply Sharad Pawar : ठरलं ! २७ ऑगस्टला अजित पवार बीडमध्येच देणार पवारांच्या सभेला प्रत्युत्तर

दरम्यान, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतील बंड, लोकसभेसाठी भाजप झालेले आक्रमक, यातूनच दोन्ही पवारांची भेट आदी पार्श्वभूमीवर वडेट्टीवार मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली. यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com