Uddhav Thackeray News : "उद्धव ठाकरे आमदाराकीचा राजीनामा देणार होते, त्याचे काय झाले ?" भाजप नेत्याचे ठाकरेंच्या वर्मावर बोट

Thackeray Group VS BJP : भाजप-ठाकरे गटातील आगपाखडीने राज्यातील वातावरण पेटणार
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai News : शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सलग दुसऱ्या दिवशीही टोकदार मुलाखतीने सत्ताधाऱ्यांच्या गोटात उडवलेला धुरळा कायम आले. हा धुरळा गुरुवारीही राज्याच्या राजकीय पटलावर घोंगावताना दिसत आहे. भाजपात 'राम' राहिला नसून सर्व 'आयाराम-गयाराम' असल्याची ठाकरेंची टीका काळजात शिरल्याने भाजप नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. एवढे बोलणाऱ्या ठाकरेंनी विधानपरिषदेच्या राजीनाम्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले, असा खडा सवालही भातखळकरांनी यावेळी उपस्थित केला. ठाकरे-भाजपमधील या आगपाखडीने राज्यातील वातावरण ऐन पावसाळ्यात पेटण्याची शक्यता आहे.(Latest Political News)

Uddhav Thackeray
Pune Politics : पुण्याचे पालकमंत्री दादाच; फक्त चंद्रकांतदादांऐवजी जबाबदारी अजितदादांना मिळणार?

ठाकरेंच्या 'इंडिया'ची लढाई एका व्यक्तिविरुद्ध नसून हुकूमशाहीविरुद्ध आहे. भाजपमध्ये राम राहिला नसून सर्व आयाराम असल्याच्या आरोपांवर भातखळकर म्हणाले, "ठाकरे एक भ्रमिष्ठ आणि मोदीद्वेषाने पछाडलेले गृहस्थ आहेत. कोविडच्या काळात घरात बसले. सचिन वाझेला भ्रष्टाचारासाठी रान मोकळे करून दिले. पक्ष गेला, चिन्ह गेले सरकार गेले जवळची लोक सोडून गेली तरीही हे मोदीद्वेषाची बडबड करतात."

भाजपला सत्तेची मस्ती असली तरी सत्तेबाबत आत्मविश्वास नसल्याची टीका ठाकरेंनी केली. यावर भातखळांनी मोदींमुळेच शिवसेनेला कधी नव्हे ते यश मिळाल्याचे सांगितले. "भाजपला आत्मविश्वास नव्हता तर ठाकरे २०१९ मध्ये युतीत कशाला आले असते. आधी म्हणाले २५ वर्षे मी युतीत सडलो, मग लोकसभेला, विधानसभेला युती केली. मोदींच्या नावावर निवडून आल्यानंतर राज्यातील जनतेशी विश्वासघात केला", असा आरोप भातखळकरांनी केला.

"दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या ताकदीवर शिवसेनेच्या इतिहासात कधी खासदार आले नाहीत तेवढे हे २०१४ आणि २०१९ आले. २०१९ ला जागा घेतल्या पण उमेदवार नव्हते. त्यांना भाजपने उमेदवारही दिले. ठाकरे तद्दन खोटे बोलतात", असा टोलाही भातखळकरांनी लगावला.

Uddhav Thackeray
Sana Malik meet DCM Ajit Pawar : नवाब मलिकांची मुलगी अजितदादांना भेटणार ; मतदारसंघातील कामाचा आढावा घेणार

पंतप्रधान मोदी आणि शाह यांना बाळासाहेबांनी वाचवले त्याचे हे पारणे फेडतात, या आरोपांवर चिडलेल्या भातखळकरांनी ठाकरेंनी आधी निवडून यावे असे आव्हान केले. "विधानपरिषदेच्या राजीनामा देणार होते, तो दिला की नाही दिला अजून? दिला नसेल तर या अधिवेशनामध्ये. एक जागा का अडवून बसलाय. करदात्यांच्या पैशांचा असा अपव्यय का करताय? अमित शाह आणि मोदी स्वतःच्या ताकदीवर निवडून येतात. जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे ते प्रमुख आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली योग्यता ओळखून एखाद्या शाखाप्रमुख लेव्हलच्या व्यक्तवीर भाष्य करावे. उगीच देशपातळीवर बोलून नये. त्यांचा उरलासुरला पक्ष आता मुंबईच्या बाहेरही नाही याची जाणीव त्यांनी ठेवावी."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com