
Balasaheb Thorat News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वादाची गंभीर दखल पक्षश्रेष्टींनी घेतली आहे. मात्र, थोरात यांच्यासारख्या ज्येष्ट नेत्याने थेट राजीनाम्याचे हत्त्यार उपसल्यामुळे दिल्लीमध्ये याचे पडसाद उमटले आहेत. या वादात नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली झाली आहे.
थोरात आणि पटोले यांच्यातील मतभेद समोर आल्यानंतर अशिष देशमुख यांच्यासह विदर्भातील माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) या नेत्यांनी देखील पटोले यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पटोले यांच्याबाबत काँग्रेसला (Congress) काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, असे जाणकार सांगतात.
काँग्रेसच्या कार्यकारीनीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. त्या बैठकीत पटोले-थोरात वादावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसचे 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला रायपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या आधी राज्यामध्ये काही फेरबदल होण्याची शक्याता काँग्रेस सूत्रांनी व्यक्त केली.
यामध्ये नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केले जाऊ शकते, अशी ही शक्यता आहे. त्यांच्या जागी सुनील केदार, संग्राम थोपटे किंवा यशोमती ठाकूर यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. त्यातच विजय वडेट्टीवर यांनी आज दिल्ली येथे जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. या भेटीवेळी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी आणि थोरात यांनी दिलेला विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा या विषयांवर चर्चा झाली असावी, असे सांगितले जात आहे.
या भेटीनंतर वडेट्टीवार म्हणाले ''थोरातांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय देखील हायकमांड घेईल. खर्गे यांच्यासोबतच्या भेटीबद्दल वडेट्टीवार म्हणाले की, खर्गे काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच मी त्यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी मी राज्यातली परिस्थिती त्यांच्या कानावर घातल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता थोरात यांच्या सोबतचा वाद पटोलेंचे पद हिरावणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.