Thane Politics : ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या गडाला सुरुंग; नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर?

ठाण्यातील शिंदे गटाच्या बॅनर्सवर राष्ट्रवादीच्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Eknath Shinde| Jitendra Awhad
Eknath Shinde| Jitendra Awhad

Thane Politics : राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीतील तिनही पक्षांची गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात तर दिवसेंदिवस ही गळती अधिकच तीव्र होऊ लागली आहे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनंतर आता ठाण्यात एक मोठा नेता शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला हेच शिंदे गटाच्या वाटेवर असण्याची शक्यता ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Eknath Shinde| Jitendra Awhad
BRS News : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री ; BRS या माध्यमातून होतोयं सक्रीय

नजीब मुल्ला शिंदे गटात गेल्यास हा ठाण्यातील राजकारणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे नजीब मुल्ला यांचा वाढदिवसानिमित्त ठाण्यात त्यांचे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे बॅनर्स राष्ट्रवादीने लावलेले नाहीत तर शिंदे गटाने लावल्याची माहिती आहे. "हॅपी बर्थडे नजीब मुल्ला,'' असा मजकूर या बॅनर्सवर लिहिला आहे. या बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. त्यामुळे नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

याहून धक्कादायक बाब म्हणजे फक्त नजीब मुल्लाच हेच नव्हे तर मुंब्र्यातील इतरही नगरसेवक शिंदे यांच्या गळाला लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील सक्रिय नेते उभे करण्याची रणनीती शिंदे गटाने आखली असल्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे नजीब मुल्ला हे फक्त जितेंद्र आव्हाड यांचेच नव्हे तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याही जवळचे मानले जातात. त्यातच महापालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आव्हाड यांच्या विरोधात नजीब मुल्ला यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची परिसरात चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com