Shiv Sena : धनुष्यबाण कुणाला; उद्या होणार फैसला ?

Maharashtra Politics : ठाकरे - शिंदेंसाठी उद्याचा दिवस ठरणार महत्वाचा
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest NewsSarkarnama

Maharashtra Politics : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापैकी धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची महत्वाची सुनावणी उद्या (ता.20 जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पार पडणार आहे.

त्यामुळे निवडणूक आयोग नेमकी काय निर्णय देणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे.

गेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्यावतीने अँड. कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली होती. यावेळी ठाकरे गटाला आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यांनी आयोगाकडे अधिकचा अडीच तास वेळ मागितला होता. उद्धव ठाकरे हे घटनेनुसार पक्षाचे पक्षप्रमुख आहेत.

शिवसेनेत फूट पडलेली नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे. ते सर्व कपोलकल्पित आहे. सर्वोच न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये. मूळ पक्ष हा लोकप्रतिनिधींना तिकिट देतो. त्यामुळं मूळ पक्ष महत्त्वाचा आहे, असा युक्तीवाद ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आला होता.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Parth Pawar : शंभूराज देसाईंना पार्थ पवार भेटले अन् चर्चांना उधाण आलं

तसेच उद्धव ठाकरे हे बेकायदेशीरपणे घटनेत बदल न करता पक्षप्रमुख झाले आहेत, असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलांनी 10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत केला होता. त्याला उत्तर देताना पक्ष नेतृत्वात झालेले बदल हे निवडणूक आयोगाला सादर केले होते.

त्यांनी या सर्व बाबी तपासून पाहिल्या आहेत. असा युक्तीवाद ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी केला. तर यावेळी सिब्बल यांनी शिंदेंनी मुख्य नेतेपदी स्वत:ची निवड कशी केली? असा सवाल देखील निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद करताना उपस्थित केला.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Aurangabad Crime News : एसीपी ढुमेंना पदावर राहण्याचा अधिकार नाही, बडतर्फ करा..

तर शिंदे गटाच्यावतीने अँड. महेश जेठमलानी यांनी त्यांच्याकडे संख्याबळ आहे. लोकशाहीत संख्याबळाला अधिक महत्त्व असते. यासह शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रात त्रृटी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. यावर शिंदे गटाने कागदपत्रात कोणत्याही त्रृटी नाहीत असा युक्तीवाद केला होता. तसेच लवकरात लवकर या संदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाच्यावतीने करण्यात आली होती.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Politics : धामणीकर लईच हुश्शार! सरपंचाचे वळसे पाटलांना तर उपसरपंचाचे आढळराव पाटलांना निवेदन

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 40 आमदारांसोबत शिवसेनेतून (ठाकरे गट) बंड करत बाहेर पडले होते. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस याचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही नेत्यांकडून पक्ष चिन्हावर दावा करण्यात आला. त्यामुळे हा वाद थेट कोर्टात गेला.

त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) सोपवला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) नेमकी कुणाची? याबाबत निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद सुरू आहे. आता उद्या निवडणूक आयोग काय निर्णय देणार? की पुन्हा सुनावणी पुढे जाणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com