प्रताप सरनाईकांबद्दल लवकरच बातमी मिळेल; संजय राऊतांचे संकेत

खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.
sanjay raut hints about shivsena mla pratap sarnaik
sanjay raut hints about shivsena mla pratap sarnaik

मुंबई : शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याबाबतही चर्चा झाली. 

आमदार सरनाईक यांनी एक पत्र मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्याचा कसा प्रयत्न करत आहेत, सरकारमधील मंत्र्यांना आणि सनदी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा शिवसेनेच्या मागे कसा लावत आहेत? याचा उल्लेख होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी जुळवून घेण्याची विनंतीही या पत्रात करण्यात आली होती. या पत्राने शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती.

आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमागे हे पत्र कारण असल्याचे समजते. या बैठकीनंतर बोलताना राऊत म्हणाले की, प्रताप सरनाईक यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. त्यांनी त्यांच्या पत्रात आजन्म शिवसेनेतच राहील, अशी भावना व्यक्त केली आहे. मी उद्धव साहेबांनाही हे सांगितले आहे. सरनाईक यांच्यासंदर्भात लवकरच तुम्हाला एक बातमी मिळेल.

सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.

कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com