उद्धव ठाकरेंशी मातोश्रीवर दोन तास चर्चा केल्यानंतर संजय राऊत म्हणाले...

खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.
shivsena leader sanjay raut meets chief minister uddhav thackeray
shivsena leader sanjay raut meets chief minister uddhav thackeray

मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये स्वबळाची भाषा सुरू झाल्याने राज्य सरकारमधील मतभेद समोर आले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. राज्य सरकारसह संघटनात्मक बाबींवर या दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. 

या बैठकीनंतर बोलताना राऊत म्हणाले की, पक्षप्रमुख मुख्यमंत्री आहेत पण माझी आजची चर्चा ही आमच्या पक्षप्रमुखांशी झाली. संघटनात्मक गोष्टींवर चर्चा झाली आहे. पक्ष मजबूत असेल तर सरकार अधिक काळ टिकेल. राज्यात मुख्यमंत्री आमचाच राहील. संघटनेचे काम करणे गरजेचे आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असून, त्याच्या त्यावरही  मुख्यत्र्यांचे काम सुरू आहे. 

माझी आणि पक्षप्रमुखांची भेट ही बाहेर चर्चा व्हावी अशी नाही. त्यात विशेष असे काही नाही. सरकारमध्ये सगळे काही स्थिरस्थावर आहे. कोणी काहीही ढोल बडवले, तरी हे राज्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आमचे सरकार कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेल, असे राऊत यांनी सांगितले. 

तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, आज आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि संयुक्त पुरोगामी आघाडीतही (यूपीए) नाही. राष्ट्रीय स्तरावर एक आघाडी स्थापन करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न दिसतोय. त्यामुळे जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांना विरोधी पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवारांची याबाबतची काही भूमिका काही असेल तर ती योग्य आहे. एक भक्कम आघाडी पर्याय म्हणून उभी राहत असेल तर आमचे प्रमुख तिच्याच सहभागी होण्याचा निर्णय घेतील.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची नुकतीच भेट झाली. याबद्दल राऊत म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी कुणाला भेटावे आणि पवार साहेबांनी कोणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न आहे. पवार साहेब कोणाची भेट घेत असतील तर आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com